आज पासून सुरू होणार राष्ट्रीय खोखो स्पर्धेत घमासान!!!
३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२१ या कालावधीत उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे किशोर व किशोरी हे दोन्ही संघ सहभागी होण्यासाठी उना, हिमाचल प्रदेश येथे पोहचले आहेत. महाराष्ट्राच्या किशोर संघाचे कर्णधारपद उस्मानाबादच्या सोत्या वळवी याच्याकडे सोपवले असून किशोरी संघाचे कर्णधारपद सांगलीच्या सानिका चाफेकडे दिले आहे.
या स्पर्धेत गतविजेत्या महाराष्ट्राच्या किशोरांच्या गटात छत्तीसगड, पंजाब, गोवा व नागालँड या संघांचा समावेश असून गतउपविजेत्या महाराष्ट्राच्या किशोरींच्या गटात केरळा, मणीपुर, चंडीगढ व नागालँड या संघांचा समावेश आहे. किशोरींना गटविजेत्या ओडिसाचा मोठा मुकाबला असणार आहे.
या स्पर्धेत डॉ. चंद्रजीत जाधव, ऍड. गोविंद शर्मा, प्रशांत (काका) पाटणकर, संदीप तावडे, सुरेंद्र विश्वकर्मा, सचिन गोडबोले, कृष्णा करंजाळकर, प्रभाकर काळे व पल्लवी वेंगुर्लेकर हे पदाधिकारी व पंच म्हणून महाराष्ट्रा कडून सहभागी होत आहेत.
१४ नोव्हें.ला धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे येथे झालेल्या मैदानी निवड चाचणीमध्ये महाराष्ट्रचे किशोर-किशोरी संघ निवडले गेले होते. या खेळाडुंचे स्पर्धापूर्व सराव शिबीर रा. फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे च्या प्रांगणात १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर ह्या कालावधीत पार पडले. खेळाडूंचा निरोप समारंभा वेळी माजी आमदार श्री. संदीपजी नाईक उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना स्पर्धे कलावधीत उपयोगी होतील आशा भेटवस्तू देण्यात आल्या. सदर समारंभास काही नवी मुंबकरांनी उपस्थित राहून या गुणी खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा:
सीआयडीकडून परमबीर यांना दोन समन्स
मुंबई हादरली! कुर्ल्यामध्ये तरुणीची बलात्कारानंतर हत्या
गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती
गोव्यात होणार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रदेश अधिवेशन
महाराष्ट्राचे संघ.
किशोर : जिशन मुलाणी, मोहन चव्हाण (सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), तौफिक तांबोळी (पुणे), ईशांत वाघ ( अहमदनगर), अथर्व पाटील (सांगली), सोत्या वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे (उस्मानाबाद), सागर सुनार ( मुंबई उपनगर), नीरज खुडे ( सातारा). प्रशिक्षक : प्रफुल्ल हाटवटे (बीड), व्यवस्थापक : मंदार परब, फिजिओ : डॉ. किरण वाघ (अहमदनगर).
किशोरी : सुषमा चौधरी, साई पवार ( नाशिक), प्राजक्ता बनसोडे (सोलापूर), धनश्री कंक, दीक्षा साठे (ठाणे), सायली कार्लेकर ( रत्नागिरी), अंकिता देवकर, धनश्री करे (पुणे), समृध्दी पाटील, सानिका चाफे (सांगली), संचीता गायकवाड ( सातारा), प्राजक्ता औशिकर (धुळे). प्रशिक्षक : एजाज शेख (मुंबई). व्यवस्थापक : प्रियांका चव्हाण (ठाणे),