लवकरच मुंबई होणार शंभर टक्के लसवंत!

लवकरच मुंबई होणार शंभर टक्के लसवंत!

कोरोना महामारीने संपूर्ण जगला गेल्या दोन वर्षांपासून संकटात आणले होते. पण आता हळूहळू या महामारीच्या संकटातून जगासह भारत बाहेर पडत आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे देशात झालेले मोठ्या प्रमाणावर लसीकरण. मुंबई लसीकरणामध्ये पुढे असून शंभर टक्के प्रौढ लसीकरण होण्याच्या वाटचालीवर मुंबई आहे.

मागील १५ महिन्यांपासून देशात लसीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. या लसीकरणामध्ये मुंबई सर्वात पुढे आहे. संपूर्ण लसीकरणापासून मुंबईकर जवळपास ३४ हजार डोसच दूर आहेत. हे डोस पूर्ण होताच मुंबईतील सर्व प्रौढ लसवंत होणार आहेत. त्यानंतर मुंबई हे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणारे देशातील पहिलेच शहर ठरणार आहे.

साडेचार महिन्यांपूर्वी नोव्हेंबर मध्ये मुंबई शहराने शंभर टक्के लसीचा पहिला डोस पूर्ण केला होता. मुंबईची अंदाजे प्रौढ लोकसंख्या ९२.३६ लाख आहे, त्यापैकी ९९ टक्के लोकांनी शनिवारपर्यंत दोन्ही डोस घेतले होते. आता मुंबई सहा ते सात दिवसांत शंभर टक्के पूर्ण लसीकरण पूर्ण करणर आहे.

लसीकरणामध्ये मुंबईने दिल्ली, चेन्नई अशा मोठ्या शहरांना लसीकरणाच्या शर्यतीत मागे टाकणार आहे. दिल्लीने आपल्या प्रौढ लोकसंख्येपैकी केवळ ९१ टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस दिले आहेत. तर चेन्नईमध्ये ८१ टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस दिले आहेत. तर बेंगळुरूमध्ये ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच पुणे शहराने ९० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे.

हे ही वाचा:

दिल्लीहून श्रीनगरला जाणारं विमान खांबाला धडकलं

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची हिजाबच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात धाव

‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’

आदिवासींचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र; दोघांना अटक

कोविड -19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी लसीकरणामुळेच मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून सावरली असे त्यांनी म्हटले आहे. दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता. तसा झाला नसण्यामागचं कारण मोठ्या प्रमाणात झालेलं लसीकरण हेच आहे असे ठोस जोशी म्हणाले आहेत.

Exit mobile version