भारताचे नवे सरन्यायधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही रामण्णा यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. काल सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे हे या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्यानंतर बोबडे यांनीच शिफारस केल्याप्रमाणे एन. व्ही. रामण्णा यांची नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हे ही वाचा:
खरा सूत्रधार मंत्रालय सहावा मजला की सिल्वर ओक?
कोविड जगातील सर्वोच्च शिखरापर्यंत
ट्रम्पनंतर बायडनचेही ‘अमेरिका फर्स्ट’
‘एका अनिलवर थांबून चालणार नाही’
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यापूर्वीच न्यायमुर्ती रामण्णा यांच्या शिफारसीला मान्यता दिली होती. आज त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ राष्ट्रपती भवनात देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.
Justice N.V. Ramana sworn in as the Chief Justice of the Supreme Court of India at Rashtrapati Bhavan today. pic.twitter.com/eSeccJOH8R
— President of India (@rashtrapatibhvn) April 24, 2021
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी नियुक्त होण्यापूर्वी रामण्णा दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश होते. न्यायमुर्ती शरद बोबडे हे २३ एप्रिल २०२१ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर आता रामण्णा यांनी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्विकारला आहे. न्यायमुर्ती रामण्णा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे.
न्यायमुर्ती रामण्णा यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आंध्र प्रदेशच्या विविध न्यायालयांतून वकीली केली. त्यानंतर त्यांची २७ जुन २००० रोजी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणुक झाली होती. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायधीश म्हणून १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत काम पाहिले होते. आता त्यांची नियुक्ती भारताचे ४८वे सरन्यायधीश म्हणून करण्यात आली आहे.