पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या जनसभेला संबोधित करत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत अनेक गोष्टी सांगत ७,५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद मोदी यांची नजर एका लहान मुलाकडे वळली, तो लहान मुलगा हात हलवत पंतप्रधान मोदींकडे बोट करत होता.यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, बेटा, मला तुझे प्रेम मिळाले… आता तुझा हात खाली कर, नाहीतर तुझा हात दुखेल.
पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशातील झाबुआ येथे आदिवासी सभेला संबोधित करत होते. दरम्यान, सभेत एक मुलगा वडिलांच्या खांद्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकत होता. ते लहान मूल हात हलवत पंतप्रधानांना अभिवादन करत होतं. मंचावरून पंतप्रधान मोदींची नजर त्या लहान मुलावर पडली आणि ते म्हणाले की, बेटा, आता तुझा हात दुखेल, मला तुझे प्रेम मिळाले आहे ..आता तुझा हात खाली कर..तू खूप केलंस..नाहीतर तुझा हात दुखेल.
हे ही वाचा:
राजदीप सरदेसाईंची पत्नी सागरिकावर तृणमूल मेहेरबान, मिळाले राज्यसभेचे तिकीट
बापरे! जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर आढळला नवजात अर्भकाचा मृतदेह!
हमास बोगदा थेट गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाखाली सापडला
ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘त्या’ विद्यार्थ्याला केले एका सत्रासाठी निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर त्या लहान मुलाने आपले हात खाली केले.त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शाब्बास! तुम्ही शहाणे आहात.हे पाहून संपूर्ण सभेत मोदी-मोदीच्या नावाची घोषणाबाजी सुरु झाली.सभेत बसलेल्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साधेपणा दिसला.
दरम्यान, आपले सरकार आदिवासींच्या हितासाठी काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत सांगितले.तसेच विरोधी पक्षावर टीका केली अन म्हणाले की, काँग्रेसला फक्त निवडणुकीच्या वेळीच गाव, गरीब लोक, आणि शेतकरी आठवतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.तसेच मी झाबुआमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी नाही तर तुमचा सेवक म्हणून आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यंदाचा मध्यप्रदेशातील पहिलाच दौरा आहे.