अयोध्येत आकारास येत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराची आता प्रत्येकालाच प्रतीक्षा आहे. नव्या वर्षात २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होत असून त्यासाठी अवघी अयोध्या सज्ज होत आहे. यानिमित्ताने प्रभू श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती कुणी केली, त्याचे रचनाकार कोण, त्यांची पार्श्वभूमी काय, याविषयी थोडक्यात…
हे ही वाचा:
काँग्रेस नेते सुनील केदारांची आमदारकी रद्द, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा!
ठाण्यात आता तांबड्या पांढऱ्या रंगाचा ‘झेब्रा’
इस्राइली व्यापारी जहाजावर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला
इस्राइली व्यापारी जहाजावर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला
- अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे रचनाकार सोमपुरा कुटुंबीय आहेत.
- या मंदिराची मूळ रचना १९८८साली सोमपुरा कुटुंबाने केली.
- सोमपुरा कुटुंबात १५ पिढ्यांमध्ये मंदिरे बांधण्याची परंपरा आहे.
- देशभरात त्यांनी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. जवळपास २०० मंदिरे सोमपुरा कुटुंबाने बांधली आहेत.
- या मंदिरांमध्ये सोमनाथ, अक्षरधाम, कोलकातामधील बिर्ला मंदिर यांचा समावेश आहे.
- प्रभू श्रीरामाचे मंदिर हे नागर शैलीत बांधले जात आहे.
- हे मंदीर तीन मजली असून त्याची उंची १६१ फूट इतकी आहे.