ऑनलाइन सुनावणी; त्यात गायली जुहीची गाणी

ऑनलाइन सुनावणी; त्यात गायली जुहीची गाणी

दिल्ली उच्च न्यायालयामध्ये बुधवारच्या सुनावणीत एक विचित्र प्रसंग घडला. दिल्ली उच्च न्यायालयात अभिनेत्री जूही चावलाच्या 5G नेटवर्क या केंद्राच्या योजनेला आव्हान देणारी याचिका यावर सुनावणी होती. दृकश्राव्य माध्यमातून सुनावणी सुरू होताच, “जुही मॅम कुठे आहे? मी तिला पाहू शकत नाही’’. असा आवाज ऐकू आला.

आभासी सुनावणीच्या सुरूवातीला असे व्यत्यय आल्यामुळे न्यायाधीशांनाही समजेनासे झाले. न्यायमूर्ती जे आर मिधा आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यासह सर्वांनी या आवाजाकडे दुर्लक्ष करणे अधिक पसंत केले. परंतु जेव्हा जुही चावला लॉग इन झाली त्यावेळी मात्र कहरच झाला. संबंधित व्यक्तीने जुहीच्या चित्रपटातील गाणी गाण्यास सुरुवात केली. कोर्टाच्या सुनावणी दरम्यान कुणीतरी गाणी गात आहे हे कुणाच्याच पचनी पडले नाही. आईनामधील मेरे बन्नो की आएगी बारात, हम है राही प्यार के मधील घूँघट की आड से दिलबर का, नाजायजमधील लाल होठों पे गोरी किसका नाम है अशी गाणी ही व्यक्ती म्हणत होती.

हे ही वाचा:
जुलैपासून भारतात फायझरची लस?

त्यांनी केले ‘चमकोगिरी’चे आंदोलन

अटी-शर्तींसह का असेना पण पुन्हा चित्रिकरणाला परवानगी द्या

मिधाने तातडीने त्या व्यक्तीला कृपया नि: शब्द करा असे म्हटले. न्यायाधीशांनी आपल्या कर्मचार्‍यांना कोर्टाचा अवमान केल्याची नोटीस बजावताना दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्याचे आणि अज्ञात गुन्हेगाराची ओळख पटवण्याचे निर्देश दिले. नंतर उघड झाले की, जुहीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हायकोर्टाच्या सुनावणीची लिंक पोस्ट करुन सर्वांना या कार्यवाहीत सामील होण्याचे स्वागत केले होते.

5G तंत्रज्ञानाशी संबंधित तिच्या चिंतेबाबत सरकारला कल्पना न देता जुहीने हायकोर्टात दावा केला होता. देशात 5G वायरलेस नेटवर्क बसविण्याविरोधात थेट दावा दाखल केल्याबद्दल हायकोर्टाने जुहीची चौकशी केली. यावर मिधा म्हणाल्या, चावला आणि इतर दोन जणांनी प्रथम त्यांच्या हक्कांसाठी सरकारकडे जाणे आवश्यक होते. ते नाकारले गेले तर त्यांनी न्यायालयात यावे. त्यादृष्टीने केंद्राने या खटल्यात तथ्य नसल्याचे सांगत खटला रद्द करावा अशी मागणी केली.

चावला आणि अन्य याचिकाकर्त्यांनी असा दावा केला आहे की, भारताच्या 5G जी वायरलेस तंत्रज्ञानामुळे मानवावर गंभीर परीणाम होईल. पृथ्वीच्या नैसर्गीक व्यवस्थेला हानी पोहोचेल अशी भीती त्यांच्याकडून दाव्याअंतर्गत व्यक्त करण्यात आली होती.

Exit mobile version