‘भारतात अशांतता निर्माण करण्याचा भारतविरोधी शक्तींचा प्रयत्न’

रास्व संघाच्या प्रतिनिधी सभेत सादर केलेल्या अहवालामधील चिंतन

‘भारतात अशांतता निर्माण करण्याचा भारतविरोधी शक्तींचा प्रयत्न’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने रविवारी राष्ट्रीय सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांचा कालावधी आणखी तीन वर्षांसाठी वाढवला. याच बैठकीत संघाने सन २०२३-२४चा वार्षिक अहवाल सादर केला. त्यात त्यांनी भारत, हिंदुत्व किंवा संघाच्या विरोधात असणाऱ्या शक्ती या तिघांच्या कार्यात अडथळे आणण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी नवनव्या योजना आखत आहेत,’ असे नमूद केले आहे.

संघाने या अहवालात सन २०२३-२४ हे सुवर्ण वर्ष म्हणून ओळखले जाईल, असे सांगून हे वर्ष राष्ट्रीय पातळीवर उत्साहवर्धक, सकारात्मक ठरले, असे कौतुक केले आहे. हे सांगताना त्यंनी राम मंदिराची निर्मिती, चांद्रयान ३चे यश आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या प्राचीन व शाश्वत संकल्पनेवर आधारित जी २० परिषदेचे आयोजन यांचा उल्लेख केला.

या अहवालात कोणत्याही पक्षाचे नाव न घेता राजकीय पक्षांकडून सनातन धर्मावर होणारी टीका व उत्तर-दक्षिण राज्ये असा भेदभाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर टीका केली. तसेच, शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे पंजाबमध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत चिंताही व्यक्त केली. तसेच, संदेशखालीतील अत्याचारांचा निषेध केला आणि मणिपूरमधील जातीय संघर्षाबाबत चिंताही व्यक्त केली.

हे ही वाचा:

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सात हजार कोटींची देणगी!

ताबडतोब आत्मसमर्पण करा, सर्वोच्च न्यायालयाचे आप नेते सत्येंद्र जैन यांना आदेश!

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा १६ वर्षांचा दुष्काळ संपला!

अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले

तसेच, आगामी निवडणुकीत प्रत्येक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मत देण्यापुरतेच सीमित राहू नये, तर १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न करावा. त्यानुसार त्यांच्या त्यांच्या परिसरात नियोजन करावे, असे आवाहन संघाने केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सन २०२५मध्ये १००व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्यांचे कार्य संपूर्ण मंडळांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. देशात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने संघाने यावेळी सगळ्यांनी एकजूट होण्याची गरज व्यक्त केली.

Exit mobile version