अंतिम सामन्यातील पराभवाच्या कामगिरीत काही कर्णधारांचे सातत्य

वर्ल्डकप अंतिम सामन्यात भारताला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतरच वास्तव

अंतिम सामन्यातील पराभवाच्या कामगिरीत काही कर्णधारांचे सातत्य

मोहम्मद अझरुद्दीन आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या व्यतिरिक्त, अंतिम सामन्यात गटांगळ्या खाण्याचा भारतीय कर्णधारांचा विक्रम आधीपासून आहे. सन २०२३च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाने जणू यावर शिक्कामोर्तबच केले.

सर्वोत्तम संघ, आतापर्यंतच्या सर्व १० सामन्यांत अपराजित असे असूनही एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. विश्वचषकविजेता म्हणून सर्वांनी भारतीय संघालाच पसंती दिली असताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताचा संघ गुणवत्तेच्या बाबतीत कागदावर सरस वाटत असला तरी अंतिम सामन्यात त्याची कामगिरी खालावते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा असल्याने या अपेक्षाभंगाचे दुःखही मोठे असते. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

 

इतिहास बघितल्यास गेल्या तीन दशकांत एकदिवसीय स्पर्धेतील अंतिम सामन्यांवर नजर टाकल्यास हेच दिसून येते. संघात सुपरस्टार असूनही आणि संघाच्या पाठीमागे श्रीमंत अशा बीसीसीएलचे पाठबळ असूनही हे वारंवार घडून येत आहे.
भारत अंतिम फेरीत पोहोचला असताना विजेते म्हणून त्यांना सर्वाधिक पसंती दिलेली असते, मात्र त्याला उपविजेतपदावरच समाधान मानावे लागलेले दिसते. केवळ मोहम्मद अझरुद्दीन आणि एम एस धोनी या दोन भारतीय कर्णधाराच्या नावावरच चांगले विक्रम आहेत.

 

मॅचफिक्सिंगचा आरोप असलेल्या अझरुद्दीन याच्या नावावर १९पैकी ११ अंतिम सामने जिंकल्याचा विक्रम आहे. तर, कर्णधार सौरव गांगुली याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात १४ अंतिम सामन्यांपैकी तब्बल १३ सामने भारताने गमावले होते.
शांत डोक्याच्या धोनीनेच संघाला विजयाची चव चाखण्याची सवय लावली. मोठे चषक जिंकण्यामध्ये धोनीने एक कर्णधार म्हणून नावलौकिक कमावला.

हे ही वाचा:

मनसेचे पुन्हा खळखट्याक!

मोदींना पनवती म्हणणे राहुल गांधींना भोवणार!

शाळेतील विद्यार्थ्यांना आता महाभारत आणि रामायणाचे मिळणार धडे!

धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

धोनी याच्या कर्णधारपदाखाली भारताने सर्व प्रकारच्या आयसीसी वर्ल्ड चॅम्पियन्स जिंकल्या. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी २० वर्ल्डकप या तिन्ही स्पर्धा भारताने कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या.

१९९०पासून एकदिवसीय अंतिम सामन्यात भारताची कामगिरी
(केवळ तीनहून अधिक सामन्यांची मालिका)

कर्णधार  कालावधी  सामने  विजय  पराभव  अनिकाली  जिंकण्याचा दर

मोहम्मद अझरुद्दीन १९९१-९९  १९  ११  ८  ०  ७२.७३
सौरव गांगुली  २०००-०५   १४   १   १०   ३   ९.०९
एम एस धोनी  २००८-१३   ११   ७   ४   ०   ६३.६४
सचिन तेंडुलकर  १९९६-९९   ६   १   ३   २   २५
रोहित शर्मा  २०१८-२३   ३    २  १   ०   ६६.६६
राहुल द्रविड  २००३-०५    २    ०    २  ०   ०
अजय जडेजा   १९९९   २   ०   २   ०   ०
विराट कोहली २०१७   १    ०   १   ०  ०

Exit mobile version