रोहित सरदानाच्या मृत्यूनंतर त्यांच्या विकिपीडिया पेजशी छेडछाड

रोहित सरदानाच्या मृत्यूनंतर त्यांच्या विकिपीडिया पेजशी छेडछाड

आज तक वाहिनीचे निर्भीड पत्रकार रोहित सरदाना यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या विकिपीडिया पेजशी छेडछाड करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून झाला. सरदाना यांच्या विकिपीडिया पेजवरची माहिती बदलून त्यांची बदनामी करण्यात आली. त्यांना शिव्याही देण्यात आल्या.

शुक्रवारी ‘आज तक’चे निर्भीड पत्रकार रोहित सरदाना यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकीकडे सरदाना यांच्या मृत्यूबाबत देशभर शोक व्यक्त केला जात असतानाच काही असामाजिक घटकांना मात्र त्यांच्या मृत्यूतून आनंद मिळत आहे. शर्जील उस्मानी या जिहादी विचारांच्या तरुणाने ट्विट करत सरदाना यांची बदनामी केली. त्याच्या या ट्विटला काही विशिष्ट लोकांनी पाठिंबाही दिला.

हे ही वाचा:

जिहादी उस्मानीने पुन्हा ओकली गरळ

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

जिहादी उस्मानी विरोधात नेटकऱ्यांचा संताप

अशाच काही खोडसाळ प्रवृत्तीच्या लोकांनी सरदाना यांचे विकिपीडियाचे पेज एडिट केले. हे प्रमाण इतके अधिक होते की अवघ्या काही वेळात ५०० वेळा विकिपीडियाचे पेज एडिट केले गेले. यात सरदाना यांची प्रचंड बदनामी करण्यात आली. त्यांना शिव्या देण्यात आल्या. त्यांच्यासाठी ‘दलाल जर्नलिस्ट’ ‘बूट लिकर’ असे शब्द लिहिण्यात आले. त्यांच्या नावापुढे ‘बीजेपी का दल्ला’ असे लिहिले गेले. विकिपीडिया पेजवरील वेबसाईटच्या रकान्यात ‘पॉर्नहब’ या पॉर्न साईटचे नाव टाकले गेले.

तर त्यांच्या शिक्षणाबद्दल लिहिताना ‘बॅचलर्स डिग्री इन दल्लागीरी’ असे लिहिण्यात आले. यासोबतच त्यांना ‘चड्डी संघी’, ‘गौमुत्र ड्रिंकिंग संघी’, ‘पेड भक्त’ असे निरनिराळे शब्द वापरण्यात आले. हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर सरदाना यांच्या समर्थनातही अनेक नागरिक उतरले आणि या खोडसाळांना जशास तसे उत्तर दिले.

Exit mobile version