गोवंडीतील मशिदींवरील भोग्यांविरोधात सोमय्यांचा आवाज

ट्वीटकरत दिली माहिती 

गोवंडीतील मशिदींवरील भोग्यांविरोधात सोमय्यांचा आवाज

मुंबईतील गोवंडी परिसरातील ७२ मशिदींमध्ये बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरविरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, हे लाऊडस्पीकर कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय बसवण्यात आले आहेत, जे नियमांचे उल्लंघन आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस पुढील ७२ तासांत कारवाई सुरू करतील, अशी माहिती ट्वीटकरत सोमय्या यांनी दिली. तसेच त्यांनी तक्रार दाखल केलेल्या मशिदींची नावे देखील शेअर केली आहेत.

शनिवारी (५ एप्रिल) शिवाजी नगर-गोवंडी परिसराला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी हे पाऊल उचलले. ते म्हणाले, मी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोवंडीतील ७२ मशिदींमध्ये पोलिसांच्या परवानगीशिवाय अनधिकृत लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. मी यावर अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, ही समस्या फक्त गोवंडीपुरती मर्यादित नाही तर मुंबईतील इतर अनेक भागातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. सोमय्या यांनी यापूर्वीही अशा अनेक तक्रारी केल्या आहेत आणि प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा : 

उन्हाळ्यात या ५ टिप्स नक्की फॉलो करा, तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल; दिवसभर ताजेपणा राहील

लखनौ सुपर जायंट्सच्या गडयांवर दंडाचा थरार: पंत आणि दिग्वेश चर्चेत!

भारताचा रग्बी स्टार मोहित खत्री ठरला सर्वात महागडा खेळाडू; RPL सीझन १ ला जूनमध्ये धमाकेदार सुरुवात!

IPL 2025: पंजाबच्या मैदानावर राजस्थानचा दणदणीत विजय, ५० धावांनी किंग्जचा पराभव

गेल्या अनेक महिन्यांपासून किरीट सोमय्या या मुद्द्यावर सक्रिय आहेत आणि मुंबईतील विविध भागातील मशिदींवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकरविरुद्ध मोहीम राबवत आहेत. सोमय्या यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या आहेत आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाची चौकशी सुरु करणार असल्याची माहिती आहे. किरीट सोमय्या अशा मुद्यांवर सतत आवाज उठवत आहेत. तसेच बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आवाज उठवत आहेत.

खीक्... स्वाभिमानाच्या बाता कुणी करायच्या? | Amit Kale | Sanjay Raut | | Waqf Amendment Bill |

Exit mobile version