‘स्कायरूट’ या हैदराबाद स्थित खाजगी भारतीय कंपनीने नुकतीच घन इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या मालकीच्या नागपूर जवळच्या चाचणी केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली.
स्कायरूट ही भारतातील पहिली खाजगी अवकाश संशोधन संस्था आहे. तिसऱ्या टप्प्यात वापरायच्या इंजिनाची यशस्वी चाचणी नुकतीच पार पडली. या इंजिनाच्या बांधणीसाठी अत्त्युच्च दर्जाच्या ‘कार्बन कॉंपोसिट’ पदार्थांचा वापर करण्यात आला. या चाचणीपूर्वीच ‘रमन इंजिन (द्रवरूप इंजिन)’ या इंजिनाची चाचणी झालेली असल्याने स्कायरूट या कंपनीने तिनही टप्प्यातील इंजिनांची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. रमन इंजिनाची चाचणी ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आली होती.
कलाम वर्गातील ‘कलाम-५’ हे नुकतेच चाचणी पूर्ण झालेले इंजिन आहे. याच वर्गातील इतर इंजिनांची बांधणी चालू आहे. त्यांची २०२१ मध्ये चाचणी होण्याची शक्यता आहे.
स्कायरूट ही मंत्रा, सोलर इंडस्ट्रीज, वेदांशू इनवेस्टमेंट आणि इतर काही कंपन्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी आहे.