उष्णतेचा कहर! जवानांनी वाळूत भाजले पापड

उष्णतेचा कहर! जवानांनी वाळूत भाजले पापड

देशभरात सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. राजस्थानमध्ये तर तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. या उन्हाची झळ सीमेवर तैनात असलेल्या जवानांनाही बसली आहे. बिकानेर येथील भारत- पाकिस्तान सीमाभागात पारा ४७ अंशांच्या पुढे गेला आहे. दरम्यान जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कडाक्याच्या उन्हात हे जवान वाळूवर पापड ठेवले असता पापड भाजून खाण्यायोग्य झाल्याचे पहायला मिळत आहे. दोन जवान पापड वाळूवर ठेऊन भाजत आहेत त्यामुळे या भागात किती उष्णता आहे याचा अंदाज बांधता येतो.

हे ही वाचा:

एलआयसी आयपीओ शेअर्सवर उड्या!

भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत

बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात

साईंची आरती भोंग्यावर होऊ दे, मुस्लिम समाजाची प्रशासनाला विनंती

जवानांच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे. इतक्या कडाक्याच्या उन्हातही आपले जवान चोख कर्तव्य पार पडत असल्याच्या चर्चा आहेत. “आमच्या बीएसएफ जवानांचे धैर्य उष्णतेपेक्षा जास्त कणखर आहे,” असे बीएसएफचे बिकानेर सेक्टर डीआयजी पुष्पेंद्र सिंह राठोड यांनी म्हटले आहे.

Exit mobile version