नवीमुंबईत एक अजबच बाब समोर आली आहे. एका गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापनाने भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याप्रकरणी एका महिलेकडून मोठा दंड आकारल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. एनआरआय संकुलात अनेक भटके कुत्रे फिरत असतात. म्हणून सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीने आवारात कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवर दंड आकारण्याचा निर्णय जुलै २०२१ पासून घेण्हीयात आला.
चाळीस इमारतींचा समावेश असलेल्या एनआरआय कॉम्प्लेक्सच्या व्यवस्थापनाने अंशू सिंग या महिलेला तब्बल ८ लाखांचा दंड ठोठावला आहे. अंशू सिंग या महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, संकुलात भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांना हाऊसिंग सोसायटी प्रतिदिन ५ हजार इतका दंड आकारते. हा दंड कचरा टाकण्याचे शुल्क म्हणून आकारण्यात येतो. आतापर्यंत माझ्या दंडाची एकूण रक्कम ८ लाखांपेक्षा जास्त जमा झाली असून इतर संकुलातल्या रहिवाशांची एकत्रित दंडाची रक्कम सुमारे ६ लाख आहे.
हे ही वाचा:
राज्य परीक्षा अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड
महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक
बेस्ट मुख्यमंत्र्यांचा घरातून चालवलेला ‘बेस्ट कारभार’
‘बलात्कार टाळू शकत नसाल तर त्याची मजा घ्या’ काँग्रेस आमदाराची मुक्ताफळे
आणखी एक रहिवासी लीला वर्मा यांनी सांगितले की, सोसायटीचे सुरक्षा रक्षक हे कुत्र्यांना खायला घालणाऱ्या सदस्यांवर लक्ष ठेवतात आणि त्यांची नावे लिहून ठेवतात. त्यानंतर या नावांची यादी व्यवस्थापकीय समितीला दिली जाते. गृहनिर्माण संकुलाच्या सचिव विनिता श्रीनंदन यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, संकुलातील लहान मुले भटक्या कुत्र्यांच्या मागे धावतात तसेच ज्येष्ठ नागरिक भीतीमुळे मोकळेपणाने फिरू शकत नाहीत. शिवाय स्वच्छतेशी संबंधित समस्या निर्माण होतात. कुत्रे रात्रीच्या वेळी भुंकत असतात त्रयामुळे रहिवासी रात्री नीट झोपू शकत नाहीत. हाऊसिंग सोसायटीने कुत्र्यांसाठी एक स्वतंत्र आवार तयार केले आहे. परंतु, काही सदस्य अजूनही या आवाराचा उपयोग करत नाहीत म्हणून मग असा कठोर नियम आम्ही लागू केल्याचे त्यांनी सांगितले.