सामाजिक कार्यकर्ते वसंत सुर्वे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते वसंत सुर्वे यांचे निधन

वनवासी कल्याण आश्रमाचे कोकण प्रांत सहसचिव विवेक सुर्वे यांना पितृशोक

विविध सावर्जनिक कार्यात सक्रिय असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंत आनंदराव सुर्वे यांचे बुधवार, नुकतेच कर्जत येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ होते. यावेळी कर्जत शहर आणि तालुक्यातील विविध संस्था, राजकीय पक्ष यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक यांनी अंत्यदर्शन घेतले. कोकण पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी वसंत सुर्वे यांच्या निधनबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

वसंत सुर्वे यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, दोन जावई, सात नातवंडे असा परिवार आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे कोकण प्रांत सचिव विवेक सुर्वे यांचे ते वडील होते. दिवंगत वसंत सुर्वे हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. मूळ कोकणातील असलेल्या वसंत सुर्वे यांचे आई-वडील चरितार्थासाठी कर्जत येथे आले. जन्मगाव कर्जत असलेल्या वसंत सुर्वे यांनी शिक्षण पूर्ण करून कमानी इंजीनियरिंग या कंपनीत नोकरी सुरु केली. त्यावेळी रा.स्व. संघाच्या कामाला प्रतिकूल काळ असताना लक्ष्मणराव भट यांच्या संपर्कातून रा.स्व.संघाशी जोडले गेले होते. साप्ताहिक विवेकचे माजी संपादक राजाभाऊ नेने, ज्येष्ठ संघ प्रचारक दादा चोळकर तसेच विष्णू गांगल, रजन कुळकर्णी, अशोक कुलकर्णी अश्या सहकाऱ्यांच्या सहवासात वसंत सुर्वे यांची वैचारिक भूमिका तयात झाली होती.

कर्जत भागात सर्वत्र रा.स्व. संघाच्या कामाचा प्रसार करण्यात वसंत सुर्वे आघाडीवर होते. युवक मोठया संख्येने जोडण्यावर ते भर देत असत. कर्जत परिसरात सामाजिक कामात सक्रिय होते. जनसंघाच्या कामात सहभाग वाढवला होता.पराभवाची खात्री असूनही जनसंघाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी प्रयत्नशील राहिले. जनसंघामध्ये रोजच्या जगण्याच्या प्रश्नांवर आंदोलनकरण्यासाठी सुरु केलेल्या महिला आघाडीत वसंत सुर्वे यांनी आपली आई लक्ष्मी सुर्वे आणि आईच्या मैत्रिणी माई करमरकर, माई साने यांना सहभाग घेण्याचा आग्रह धरून सक्रिय केले होते. भारतीय जनता पार्टीत विविध जबाबदाऱ्या घेऊन काम केले होते. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी वसंत सुर्वे यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र विचारधारा सोडण्यास ठाम नकार दिला होता.

श्रीराम मंदिर निर्माण चळवळ, १९९० आणि १९९२ च्या कारसेवा, विश्व हिंदू परिषद यासह कपालेश्वर देवस्थान, रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, जनता ग्राहक भांडार, मिडल क्लास को ओप हौसिंग सोसायटी, अभिनव ज्ञान मंदिर, अखंड हरिनाम सप्ताह या संस्थामध्ये सक्रिय असणारे वसंत सुर्वे निवृत्तीनंतर वनवासी-गरीब यांना सरकारी कामासाठी मदत करत होते. शासकीय कार्यालयात जाऊन विविध कामांचा पाठपुरावा करत होते.

 

हे ही वाचा:

शिवसेना जिल्हाप्रमुखाचा ‘गुटखा’ जप्त?

मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार

 

नाना गांगल, बच्चूभाई शहा, अशोक कुलकर्णी अश्या आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने वसंत सुर्वे यांनी यांनी कर्जतमध्ये पक्ष विरहित कामाला प्राधान्य दिले होते. सगळ्या मित्रांचे वार्षिक स्नेहमिलन हा त्यांचा आवडता कार्यक्रम होता.

Exit mobile version