नागपूर येथील बांबू केंद्राचे संस्थापक सुनीलजी देशपांडे यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनानाने ग्रासले असून गेले काही दिवस त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. पण या उपचारांना यश आलेले दिसत नाहीये. बुधवार, १९ मे रोजी सुनील देशपांडे यांचे निधन झाले.
देशभर सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. महाराष्ट्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या हजारो लोकांना दर दिवशी कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. बुधवारी सुनील देशपांडे यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे.
हे ही वाचा:
ममतांनीच जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिलं नाही
मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा
डीएपीच्या भाववाढीला शरद पवार, मनमोहन सिंह जबाबदार
ठाकरे सरकारची ‘सोशल’ असहिष्णुता
समाजकार्यत सक्रिय असणाऱ्या सुनीलजी देशपांडे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा संस्थांच्या माध्यमातून झाली होती. नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट येथील प्रकल्पावरही त्यांनी काम केले. पुढे त्यांनी आपले आयुष्य वनवासी बांधवांच्या विकासासाठी वाहून घेतले. पुढे त्यांनी नागपूरच्या संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरु ठेवले आणि अनेक वनवासी कुटुंबांचे आयुष्य प्रकाशमान केले.
काही दिवसांपूर्वी सुनीलजींना कोरोनाने ग्रासले. त्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.