रविवार २० ऑगस्ट,२०२३ रोजी भारत व्यायाम शाळा, माझगांव,मुंबई येथे उपकनिष्ठ, कनिष्ठ, सिनियर आणि सर्व मास्टर्स मुंबई जिल्हास्तरीय इक्विप्ड /क्लासिक बेंचप्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी मुंबई जिल्हयातील विविध व्यायाम शाळा आणि क्लब व संस्थेतील पुरुष व महिला अशा ८४ खेळाडूनी सहभाग नोंदवला. सांख्यिक विजेतेपद सोशल सर्व्हीस लिग,परळ आणि उपविजेते पद चाळके फिट ॲन्ड फाईन क्लब यांना मिळाले.
इक्विप्ड /क्लासिक स्पर्धेसाठी समीर दळवी यांना दोन बेंचप्रेस स्ट्रॉग मॅन व अर्जिक्य पडवणकर यांना बेंचप्रेस स्ट्रॉग मॅन किताबाने गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-
इक्विप्ड स्पर्धेतील पुरूष गट-
सुवर्ण पदक विजेते पुरुष खेळाडू- स्वयंम सावेत, श्रीसाई हळणकर, ईशान नाखवा, वरुण आर्य, साईराज घोंसाळकर, अजिक्य पडवणकर, शहानवाज राठोड, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र सावंत, गोपिनाथ पवार,गुलाम मोहमद शेख, जितेंद्र यादव, समिर दळवी, राजेश शेटये, अमृतराव नागरे, महेश पेडामकर, राजेश रावले आणि सुनिल अडसूळ.
रौप्य पदक विजेते पुरुष- प्लॅटो डिसिल्वा, सुहास वेंगुर्लेकर, अनिल बरे, सम्राट वलखडे,मिथुन नवखंडे,आणि तानाजी पाटील.
कास्य पदक विजेते पुरुष- तुषार भोगले, मुरलीधर सोरखंडे, सागर बांबोकर,
इक्विप्ड गटातील सुवर्ण पदक विजेत्या महिला
राजेश्री पलणकर, गीताजंली दस्तुर, रुबी दास, तुप्ती सावंत, सुखदा आंब्रे, श्रावणी पाटील,वैष्णवी चव्हाण, यश्स्वी चव्हाण, तप्ती सावंत, रेशमा भोसले, राजश्री पेलणेकर, ममता सुतार, सरिता परमार,
रौप्य पदक –रिया खटावकर, रेश्मा भोसले.
क्लासिक स्पर्धेतील पुरूष गट-
सुवर्ण पदक विजेते –
रुषभ आंब्रे, शाम सावंत, वेदांत घाग, स्वयंम सावंत, आकाश इंगवले, योगेश मुंड, देवेंद्र यजरकर, विदयाधर पाटील, ईशान नाखवा, वरुण आर्य, साईराज घोसाळकर, बेनॉर्ड रोझारिओ, अजिंक्य पडवणकर, सागर मिराशी, अनिल बरे, समिर दळवी, राजेश शेटये, अमृतराव नागरे,राजेश वैराळ, मिथुन नवखांडे राजेश रावले, सुनिल अडसूळ, गुलाम मोहमद शेख, विजय गांधी, राजेंद्र चव्हाण, आणि राजेंद्र सावंत.
हे ही वाचा:
विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
चांद्रयानाच्या लँडिंगचा ऐतिहासिक क्षण घरबसल्या अनुभवता येणार
महिला पोलिस आणि मुलगी घरी मृतावस्थेत; पतीचा मृतदेह झाडावर
सिंधूचे जागतिक स्पर्धेतील आव्हान झटपट संपुष्टात
रौप्य पदक – आदित्य दाभाडे, राकेश घाडीगांवकर,कौस्तुभ घोसाळकर, अरुण नायर, प्लॅटो डिसोझा, शहानवाज राठोड, सम्राट वलखडे, चेतन मसुळकर, सुहास वेंगुर्लेकर, सागर आंबोकर, आदित्य दाभाडे.
कास्य पदक विजेते – तुषार भोगले, मुरलीधर सोरखडे, गणेश पांचाळ
या स्पर्धेसाठी भारत व्यायाम शाळेचे अशोक शिदें सर आणि मॉर्डन टेलर्सचे मालक श्री.शरद सातार्डेकर तसेच प्रथम दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते श्री.दिलीप केळुस्कर सर, संघटनेचे सचिव समीर दळवी, संजय माधव,अनंत चाळके,सुर्यकांत गर्दे, राजन सावंत आणि विनायक अचरेकर व इतर पदाधिकारी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परीश्रम घेतले. यावेळी संजय सरदेसाई राज्य संघटनेचे सचिव यांची राष्ट्रीय फेडरेशनच्या उपध्याक्ष पदी निवड झाल्याबदल खास सत्कार करण्यात आला.