‘म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात’… !

भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लिहिलं खरमरीत पत्र

‘म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात’… !

माजी दिवंगत नेते पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून टीका केली होती. मोरारजी मोदी असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला. यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आशिष शेलार ट्विटरवर शेअर केलेल्या पत्रात संजय राऊत यांच्या राजकीय भूमिकेचा उल्लेख करत त्यांना ‘मोरारजी राऊत’ म्हणून संबोधले आहे.

आशिष शेलार आपल्या पत्रात म्हणाले, महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नवीन विकास प्रकल्प होणार असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून “हग्रलेख” लिहितात ?

आता विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावी लागतील… मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महेंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन केली? या सगळ्यांना युनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील उद्योग बंद झाले त्याचा हिशेब काढला तर मग पुण्याच्या बजाज पासून सगळया कारखान्यांमध्ये उबाठाचीच युनियन होती ना ?

हे ही वाचा:

इम्रान खान यांच्या पक्षावर पाक सरकार घालणार बंदी!

‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

चीन समर्थक केपी ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी !

महिलांना मोफत बस प्रवास देणाऱ्या कॉंग्रेसच्या शक्ती योजनेमुळे कर्नाटक परिवहन बुडाली

ते पुढे म्हणाले, वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय ? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय ? चोर तर चोर वरुन शिरजोर ? मराठी कामगारांना उध्दस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात मराठी माणासावर गोळया झाडणाऱ्या स. का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना?

काँग्रेसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का ? दुदैवाने ज्याला वेड लागते म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो त्याला ना “आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं”
म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Exit mobile version