…तर यापुढे मराठा समाजासाठी उभे राहण्याचे धाडस कुणीही करणार नाही!

नारायण राणेंवरील टीकेनंतर नितेश राणेंचे वक्तव्य

…तर यापुढे मराठा समाजासाठी उभे राहण्याचे धाडस कुणीही करणार नाही!

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नारायण राणे आणि मी नितेश राणे राज्यभर दौरे केले.समाजाच्या कुठल्या ही बांधवावर कुटलीही अडचण आली तर त्यांच्या मागे आम्ही उभे राहिलो. परंतु आम्हालाच समाज जर अडवत असेल शिवीगाळ करत असेल तर यापुढे कोणीही समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचं धाडस करणार नसल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.मराठा आरक्षणावरून मराठा समाजाच्या काही लोकांकडून नारायण राणे आणि त्यांच्या परिवाराला लक्ष करण्यात आल्यावर नितेश राणे यांनी ट्विट करत खंत व्यक्त केली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगेचं पाच दिवसांपासून जालनामध्ये उपोषण करत आहेत.मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी जरांगे सरकारकडे करत आहेत.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार थोड्या दिवसांचा अवधी मागत आहेत परंतु जरांगे आपल्या शब्दावर ठाम असून आंदोलन सुरूच ठेवले आहे.मराठा आरक्षणाचा तिढा आजून सुटला नाही. मात्र, मराठा आरक्षणावरून समाजाच्या काही लोकांकडून राणे परिवाराला लक्ष करण्यात येत आहे.मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले होते.९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा हे वेगवेगळे असल्याचे त्यांनी सांगितले होते.मी मराठा आहे मी कुणबी दाखला स्वीकारणार नाही असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

‘पुन्हा येईन’ व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांची उडवली खिल्ली

गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त

उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!

आधी हमासच्या नेत्याचे भाषण, दुसऱ्या दिवशी केरळमध्ये स्फोट

त्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाच्या काही लोकांनी नारायण राणे यांना टार्गेट केलं.मराठा समाजाच्या काही लोकांनी नारायण राणेंना दिवसा-रात्री फोन करून तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विरोधाची भूमिका मांडत आहात असे बोलत राणेंना व त्यांच्या परिवारावर बोट ठेवत शिवीगाळ करण्यात येत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नारायण राणेंसह त्यांच्या परिवाराने जी भूमिका बजावली त्याचा समाजाला विसर पडला असून समाज आमच्याविरुद्ध उभा राहून आम्हालाच लक्ष करत असल्याचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.तसेच मराठा समाजाच्या विरुद्ध भूमिकेवर नितेश राणेंनी खंत व्यक्त केली आहे.

नितेश राणे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, समजा ला आरक्षण देणारे..समजा ला आरक्षण भेटाव म्हणून राज्यभर दौरे काढणारे..समाजाच्या कुठल्या ही बांधवावर कुटलीही अडचण आली तर त्यांच्या मागे उभे राहणारे..त्यांनाच समाज अडवणार आणि शिव्या देणार असेल..तेच हात कापणार असाल..मग या पुढे कोणच समाजासाठी उभ राहण्याचा धाडस कोणही करणार नाही ..हे समजानी लक्षात ठेवावे..हे दिवस जातील..आरक्षण भेटेल ही..पण केलेली कृती आणि बोललेले शब्द नेहमी स्मरणाथ राहते..मी मराठा.. जय श्री राम 🚩, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

Exit mobile version