तर इम्तियाज जलील यांचे कोल्हापुरी पायताणाने स्वागत केले जाईल….

सकल हिंदू समाजाचा विरोध

तर इम्तियाज जलील यांचे कोल्हापुरी पायताणाने स्वागत केले जाईल….

एआयएमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कोल्हापुरात येण्यावर विरोध दर्शविला गेला आहे. सकल हिंदू समाजाने हा विरोध केला आहे. एमआयएमचा मोर्चा निघाल्यास कोल्हापुरात हिंदूंची बंदची हाक देण्यात येणार असल्याचा इशारा देखील समाजाकडून देण्यात आला आहे. १९ जुलैला एमआयएमचा मोर्चा होणार आहे. तत्पूर्वी हिंदू संघटनाही आक्रमक भूमिका घेत मोर्चाला विरोध केला आहे.

विशाळ गड हिंसाचार प्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी घटनेविरोधात कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, एमआयएमच्या या मोर्चेला सकल हिंदू समाजाकडून विरोध करण्यात आला आहे. जर इम्तियाज जलील कोल्हापुरात आले तर ‘कोल्हापुरी पायताणाने’ त्यांचे स्वागत करू आणि १९ जुलैला मोर्चा काढल्यास तर कोल्हापूर बंदची हाक देऊ, असा इशारा हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

यूपीएससी नापास, तरीही परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव… ज्योती मिश्राची चक्रावून टाकणारी कहाणी

उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; दिब्रूगड एक्स्प्रेसचे १० डबे घसरले

जगातील लोकसंख्येला मुस्लिम जबाबदार, भारतातही तीच परिस्थिती !

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल

दरम्यान, विशाळ गडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. आजची अद्याप आकडेवारी समोर आलेली नसून जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिलेल्या आकडेवारीनुसार, १०० हुन अधिक अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. अजूनही कारवाई सुरूच आहे. राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

Exit mobile version