२१ हजार अर्जांपैकी फक्त २ हजार कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मिळाली मदत!

२१ हजार अर्जांपैकी फक्त २ हजार कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मिळाली मदत!

मल्टी नॅशनल कंपन्या भारतात स्थापन करण्याची वेळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-१९ च्या २ लशी भारतीय कंपन्यांनी बनवल्यावरचे विधान.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना पन्नास हजारांची मदत जाहीर केली होती. त्यामध्ये कोविड पीडियांच्या नातेवाइकांकडून बरेच अर्ज प्राप्त झाले होते. मात्र पात्र झालेल्या अर्जांपैकी निम्याही अर्जदारांना मदत झालेली नाही.

कोविड पीडितांच्या नातेवाइकांकडून प्राप्त झालेल्या ३५ हजार १३८ अर्जांपैकी २१ हजार ४३६ सानुग्रह अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, परंतु आतपर्यंत फक्त  २ हजार २१६ अर्जदारांना ५० हजार रुपयांची मदत मिळली आहे. असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.  दरम्यान, नाकारण्यात आलेल्या १२ हजार ८७१ अर्जांपैकी ५ हजार ३ जणांनी तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली आहे.

यामध्ये मुंबईबाहेर मरण पावलेल्या ३२८ अर्जांपैकी २७३ अर्जांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ३६ रुग्णांचा मृत्यू जो मुंबईबाहेर झाला त्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. पुढे आता दुसरी बैठक आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये १९ अर्जदारांची कागदपत्रे योग्य पद्धतीने छाननी केली जाणार आहे. काल जिजामाता भोसले येथे ज्या अर्जदारांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली अशा अर्जदारांशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संवाद साधला आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंड: गाडी दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

‘शीख फॉर जस्टीस’ ला मोदी सरकारचा दणका

‘मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नका’

मुख्यमंत्री महोदय, कळकळीची विनंती!!! यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका…

अनेक अर्जदारांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ” अर्जामध्ये RT-PCR अहवाल, वैद्यकीय सारांश आणि मृत्यू प्रमाणपत्र समाविष्ट आहेत तरीही अर्ज मंजूर झालेले नाहीत.” सायनचे रहिवासी कुंतल कुमार गोसर म्हणाले, “जवळपास ६५ दिवस झाले आहेत सर्व माहिती अचूक देऊनही मला अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.” तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केलेल्या अर्जदारांच्या तक्रारींचे निरसन करण्यास सांगितले आहे.

Exit mobile version