हिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण

हिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण

रविवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे गुलमर्ग प्रदेशात अनेक पर्यटक अडकून पडले होते. रविवारी ९ जानेवारी रोजी गुलमर्ग भागात जोरदार वाऱ्यासह बर्फवृष्टी झाली. त्यावेळी या हिमवादळात अनेक पर्यटक आणि लहान मुले अडकून पडली होती. मात्र, या अडकलेल्या पर्यटकांना आणि लहानमुलांना स्नो बाईक युनियनने सुखरूप सुरक्षित ठिकाणी आणले.

शनिवारपासून जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस पडत असून एक-दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुलमर्ग येथील डोंगरांवर हे पर्यटक फिरण्यास गेले असता तेथे अचानक जोरदार वाऱ्यासह बर्फवृष्टी झाली. तेव्हा हे पर्यटक तिथेच अडकून पडले. त्यानंतर बर्फाच्छादित डोंगराळ प्रदेशात अडकलेल्या पर्यटकांची स्नो बाईक युनियनने सुटका केली. घटनास्थळावरून सर्व पर्यटकांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांनाही स्नो बाईकच्या मदतीने सुरक्षितपणे गंडोला तळावर आणण्यात आले.

स्नो बाईक युनियनच्या या बचावकार्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. पुढील आणखी एक ते दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारीही गुलमर्गमधील रस्त्यांवरून बर्फ साफ करण्याचे व्हिडीओ समोर आले होते.

हे ही वाचा:

भायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग

आजपासून यांना मिळणार बूस्टर डोस

गुरु गोविंदसिंग यांच्या सुपुत्रांचा बलिदान दिन आता ‘वीर बाल दिवस’

पाकिस्तानातील मुरी येथे बर्फवृष्टीमुळे वाहनांत अडकून पर्यटक मृत्युमुखी

भारतीय हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, जम्मू आणि काश्मीरमधील बहुतेक ठिकाणी बर्फवृष्टी होत असून विपरीत हवामानामुळे हवाई आणि रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित होऊ शकते. अतिसंवेदनशील भागात हिमस्खलन आणि भूस्खलनाची शक्यता असल्याचेही म्हटले होते.

Exit mobile version