अमरनाथ यात्रेला सुरक्षा देण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी संरक्षण दलासोबत मजबूत सुरक्षा ग्रिड स्थापन केले आहे. काश्मीरचे पोलिस महासंचालक व्ही के बिरदी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या खास मुलाखतीत याबाबत अधिक माहिती दिली. दहशतवादी संघटनांनी राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. काही गुप्त माहिती मिळाल्यानंतर ठोस रणनिती बनवण्यात आली आहे. यात्रेकरूंना त्रास होऊ नये, यासाठी हायटेक उपकरणांसह प्रवास मार्गांवर कमांडो आणि स्नायपर तैनात करण्यात आले आहेत. तसेच, काही बदलही करण्यात आले आहेत.
अमरनाथ यात्रा काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांतून जाते. या संदर्भात विस्तृत सुरक्षाव्यवस्था करण्यात आल्याची माहिती बिरदी यांनी दिली. या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र दलाच्या अतिरिक्त तुकड्या सांभाळत आहेत. याच वर्षी सुरक्षेसाठी बहुपक्षीय आणि बहुआयामी रणनीति स्वीकारली जाणार आहे. नुकतेच पोलिसांनी अनेक दहशतवादविरोधी ड्रिल करण्यात आली होती. सुरक्षा मोहिमेचा हा अविभाज्य भाग असतो. याच संदर्भात पोलिसांनी एसओपी बनवली होती. याच पार्श्वभूमीवर ड्रिल करण्यात आली. यात्रेदरम्यान संरक्षण दलांवर खूप ताण असतो. त्यांच्यात योग्य समन्वय साधला जावा, यासाठी ही ड्रिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला भारत
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी सहा. पालिका आयुक्त बेल्लाळेंची आठ तास चौकशी
‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’तून वर्षाला मिळणार तीन गॅस सिलिंडर मोफत
आपत्कालीन स्थितीशी लढण्यासाठी…
या वर्षी अमरनाथ यात्रेच्या दोन्ही मार्गांवर संरक्षण दलाची डोंगराळ भागातील बचाव मोहिमेत प्रगत असणारी माऊंटन रेस्क्यु टीम (एमआरटी) तैनात करण्यात आली आहे. सन २०२२मध्ये आलेल्या पुरात एक डझनहून अधिक जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर एमआरटी दलाच्या तैनातीकडे अधिक लक्ष देण्यात आले. बिरदी यांनी सांगितले की, यात्रा मार्ग दुर्गम आणि कठीण आहे. भाविकांच्या सुविधांसाठी अशा विविध माउंटन रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यात जम्मू-काश्मीर पोलिस, सीएपीएफ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांचाही समावेश आहे. आपत्कालीन परिस्थितीशी लढा देण्यासाठी या तुकड्या ठराविक रस्ते आणि असुरक्षित ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत, जेणेकरून कोणतीही नैसर्गिक आपत्तीची घटना घडल्यास त्यांना तातडीने मदत पोहोचवली जाऊ शकेल.
महामार्गावरही लक्ष
अमरनाथ यात्रेसाठी हायटेक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ड्रोन, सीसीटीव्ही, यूएव्ही, स्नायपर आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गावर विशेष रोड ओपनिंग पार्टी (आरओपी) तैनात करण्यात आली आहे. वीके बिरदी यांनी सांगितले की, संपूर्ण यात्रा मार्गावर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जाईल. सीसीटीव्ही कवरेज, निरीक्षण पॉइंट्स, आणि उंचावरील निरीक्षण पॉइंट्स यांसारखी रणनिती आखण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरूला त्रास होऊ नये, यासाठी जम्मू-कश्मीरच्या ट्रॅफिक विंगकडूनही वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत.