‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर

श्वान ठेवणार टपालावर नजर

‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर

भारतात परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असते. हीच अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी विमानतळ व बंदरामार्गे होणारी तस्करी शोधून काढणारे ‘स्निफर’ श्वान अर्थात वासाद्वारे माग काढणारे कुत्रे आता परदेशातून येणारी पार्सल तपासण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. सीमा शुल्क विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच टपाल खात्यातील परदेशांतून येणारी अमली पदार्थांची पार्सल शोधणे सोपे होणार आहे.

मुंबईमध्ये परदेशांतून येणारी सर्व पार्सल फोर्टमधील बॅलार्ड इस्टेट येथील मुंबई परदेशी टपाल कार्यालय येथे उतरवले जाते. सहा प्रमुख देशांतून आलेली ही पार्सल नंतर शहरातील टपाल इतर कार्यालयात पाठविली जातात. या पार्सलमार्फत सध्या ‘हायड्रोपोनिक विड’ (पाणी व कार्बनच्या सहाय्याने अफुची शेती व त्यावर प्रक्रिया करून तयार केलेला अमली पदार्थ) या अमली पदार्थांची जोरात तस्करी सुरू आहे. परदेशांतून पाठविल्या जाणाऱ्या पुस्तके वा इलेक्ट्रॉनिक वस्तू, ग्लोव्हज आदी वस्तूंमध्ये लपवून अमली पदार्थ पाठविले जातात. बऱ्याच वेळा या पार्सलवरील पत्ता चुकीचा असतो. या पार्सलची तपासणी करण्यासाठी सीमा शुल्क विभागाने स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहे.

हे ही वाचा : 

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात

बारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती

आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू  

मात्र मोठ्या संख्येने येणाऱ्या पार्सलची तपासणी करणे अडचणीचे ठरत आहे. या सर्व पार्सलची विमानतळावर तपासणी होते. तरीही काही वेळा काही पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची शक्यता वाटली तर पुन्हा तपासणी केली जाते. मात्र चुकीची ठरली तर ज्याच्या नावे पार्सल आहे ती व्यक्ती टपाल खात्यावर दावा टाकते. हे टाळण्यासाठी अमली पदार्थ हुडकून काढणाऱ्या स्निफर श्वानाची माग‍णी सीमा शुल्क विभागाने केली असून लवकरच मंजूर होण्याची शक्यत आहे. त्यामुळे आता टपाल विभागात परदेशी पार्सलद्वारे ‘हायड्रोपोनिक विड’ अमली पदार्थाची तस्करी रोखले जाण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत.

Exit mobile version