ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेत असतात. त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे राजकीय वर्तुळात काय गोंधळ होणार याकडे लक्ष असताना बुधवारी, १२ जुलै रोजी त्यांच्या पत्रकार परिषदेत वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला.
संजय राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. तेव्हा संजय राऊत यांच्या घराच्या परिसरात एक साप असल्याचे लक्षात आले. शिवाय हा साप संजय राऊत जिथे बसलेले त्या दिशेने जात होता. सुरक्षा रक्षकांना ही माहिती मिळताच त्यांनी सापाला हुसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जात नव्हता. त्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आलं. सर्पमित्र या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या सापाला पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं.
पत्रकार परिषदेच्या ठिकाणी हा साप आधीपासून लपून बसला होता अशी माहिती मिळते आहे. पाणदिवड जातीचा हा बिनविषारी साप होता. या सापला पकडल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, पत्रकार परिषदेत अचानक साप आल्याने गोंधळ उडाला होता.
हे ही वाचा:
उपनिषदांमध्येही नमूद आहे हवामान विभागाचे रहस्य
१५ वर्षांत भारतातील ४१.५ कोटी जनता गरिबीतून पडली बाहेर
समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू होणार
२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना
या घटनेनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या बंगल्यात साप निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता तरी माझी सुरक्षा वाढवा ना,” असं खोचक ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे. तसेच नौटंकी म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या बंगल्यात साप निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे…
आता तरी माझी सुरक्षा वाढवा ना plzzz🤣🤣
नौटंकी @rautsanjay61
— nitesh rane (@NiteshNRane) July 12, 2023