पहिल्या सर्पदंशात बचावला; पण पाच दिवसांनी पुन्हा साप चावल्याने मृ्त्यू

२० जून रोजी त्याला सर्पदंश झाला होता.

पहिल्या सर्पदंशात बचावला; पण पाच दिवसांनी पुन्हा साप चावल्याने मृ्त्यू

जोधपूर येथील मेहरणगड गावातील एका ४४ व्यक्तीला सर्पदंश झाला होता. चार दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो बचावला. मात्र तो घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला पुन्हा सर्पदंश झाला. यावेळी मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.

राजस्थानच्या या व्यक्तीचे नाव जसाब खान आहे. २० जून रोजी त्याला सर्पदंश झाला होता. त्याच्यावर पोखरण येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. चार दिवस उपचार केल्यानंतर तो बचावला. त्याला घरीही सोडण्यात आले. मात्र २६ जून रोजी तो घरी असताना त्याला पुन्हा सर्पदंश झाला. यावेळी त्याच्यावर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू झाले. मात्र यात त्याचा मृत्यू झाला. दोन्ही वेळेला त्याला ‘बंडी’ जातीच्या सापाने चावा घेतल्याचे उघडकीस आले आहे. सापाची ही जात राजस्थानच्या वाळवंटीय प्रदेशात आढळणाऱ्या वायपर या जातीची उपजात आहे. या घटनेचा तपास भनियाना पोलिस करत आहेत.

हे ही वाचा:

ममतांचा दुखावलेला पाय निवडणुकीत करामत करणार?

हुशार मुलांची पसंती मुंबई, दिल्ली, मद्रास आयआयटी कॉलेजांना

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी ड्रायव्हर, क्लिनरला पोलिसांनी घेतले ताब्यात

समृद्धी महामार्ग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा आक्रोश मोर्चा रद्द; ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम

२० जून रोजी जसाब याला तळव्याला सर्पदंश झाला होता. तेव्हा त्याने पोखरण येथील रुग्णालयात धाव घेतली होती. तिथे उपचार घेऊन तो २५ जून रोजी परतला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या पायावर सर्पदंश झाला. त्याचे शरीर पहिल्या सर्पदंशातून पुन्हा सावरत होते. त्यामुळे दुसऱ्यांदा सर्पदंश झाल्यामुळे तो यातून वाचू शकला नाही, असे सांगितले जाते. जसाबच्या मागे त्याची आई, पत्नी, चार मुली आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या कुटुंबीयांनी जसाबच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या सापाला मारून टाकले आहे.

Exit mobile version