महिला प्रीमियर लीग क्रिकेटच्या पहिल्याच सत्रात स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी बाजी मारली आहे. मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने ३.४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले आहे. जर ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनर ही दुसऱ्या क्रमांकाची महागडी खेळाडू ठरली आहे. गुजरात जायंट्सने तिला ३.२ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात संधी दिली आहे.
महिला प्रीमियर लीगसाठी २४६ महिला आणि १६३ परदेशी महिलांचा समावेश आहे. भारतीय महिला संघाची कप्तान हरमनप्रीत कौर हिला मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळाले असून तिला १.८० लाखांची बोली मिळाली आहे. यूपी वॉरियर संघाने सोफी ऍलेक्स्टोनला १.८० लाखांची बोली मिळाली आहे.
हे ही वाचा:
‘प्रेमाच्या प्रतिका’ला अच्छे दिन!
गुगल कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा सापडला
सरकार पडण्याची कसलीही भीती वाटत नाही
लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस
या प्रीमियर लीगसाठी एकूण १५२५ महिलांची नावे यादीत होती. त्यातून चाळणी केल्यावर ४४९ महिलांची अंतिम यादी तयार करण्यात आली. त्यात २४६ भारतीय महिला आणि १६३ परदेशी महिला आहेत. या खेळाडूंपैकी २०२ खेळाडू हे आपापल्या संघातून खेळलेले आहेत. तर १९९ खेळाडूंना अद्याप राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही. मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नताली सिव्हर हिच्यासाठी तब्बल ३.२० कोटी रुपये मोजले आहेत.
सध्या टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळत असलेल्या यास्तिका भाटियासाठी मुंबई इंडियन्सने १.५० कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे. हरमनप्रीत ही मुंबई इंडियन्सच्या कप्तानपदाची पहिली पसंती असू शकते. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत आणि रोहित शर्मा यांचा फोटो शेअर करत त्यावर कॅप्टन्स असेही लिहिले आहे. त्यावरून ती मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची कर्णधार असेल असे म्हटले जात आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकार हिदेखील मुंबई संघात आहे.