भारताची धडाकेबाज महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला आयसीसी मार्फत वूमन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे. स्मृती मानधना २०२१ या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने दुसऱ्यांदा हा बहुमान पटकावला असून हा पराक्रम करणारी ती जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
या आधी २०१८ मध्ये स्मृती मानधना हिला आयसीसीने वूमन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी हिने दोन वेळा या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. या व्यतिरिक्त अशाप्रकारची कामगिरी करणारी मानधना ही दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त थयथयाट’
…म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन
‘ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत’
‘२५ वर्षे युतीत सडले म्हणजे बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले का?’
स्मृती मानधना हिला टी२० प्रकारातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणूनही नामांकन प्राप्त झाले होते. पण हा पुरस्कार ती पटकावू शकले नाही. इंग्लंड संघाची सलामीची फलंदाज ब्युमॉन्ट प्रकारातील सर्व महिला क्रिकेटपटू ठरली आहे. पण असे असले तरीही आयसीसीच्या वार्षिक टी२० महिला क्रिकेट संघात स्मृती मानधना यांचा समावेश करण्यात आला आहे.