श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

श्रद्धा वालकरची तिच्या कार्यालयातील लोकांनी, नातेवाईकांनी मदत केली नाही

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

श्रद्धा वालकर प्रकरणामुळे भारतात खळबळ उडाली आहे. आफताब नावाच्या युवकाने ही निर्घृण हत्या केली आणि नंतर श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्यासंदर्भात त्याचा जबाब पोलिसांनी घेतले त्यावर तो म्हणाला की, रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. त्यावर महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी आपले मत मांडले.

नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, एखादा माणूस महिलेच्या शरीराचे छोटे तुकडे करतो हे भयानक आहेच पण क्षणार्धात असे कृत्य होत नाही. शिवाय, जो व्यक्ती प्रेम करतो तो त्या मुलीला मारहाण करू शकत नाही. ही व्यक्ती कायम तिला मारहाण करत होती. अनेकांना हे ठाऊक होते. पण अशा परिस्थिती तिला कुणाचीही मदत मिळू शकली नाही. खरेतर एका महिलेला अशी होणारी मारहाण किंवा कुटुंबियांकडून होत असलेला छळ याची दखल राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने घ्यायला हवी.

लव्ह जिहादबद्दल जेव्हा इराणी यांना विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, केवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी एका महिलेला किंवा तरुणीला फसवले जाते तेव्हा भाजपाशासित राज्यात कायदा होणार नाही का?

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांना टिकली, बांगडीबद्दल सूचना

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उच्च न्यायालयाची नोटीस

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

‘त्या’ ट्विटमुळे रिचा चढ्ढावर नेटकरी संतापले

 

श्रद्धाने या मारहाणीबाबत तसेच तिच्या जीवाला धोका आहे, त्याबाबत २०२०ला तक्रार दाखल केली होती, त्याबाबत इराणी यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यावर थेट काही बोलण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, श्रद्धाची जी अवस्था होती, त्याची माहिती घरच्यांना, तिच्या जवळच्या मित्रमंडळींना होती पण त्यातील कुणीही पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचवली नाही. त्यामुळे मुख्य मुद्दा हा आहे की, जे तिच्या संपर्कात होते, तिच्या कार्यालयात काम करत होते त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला, तिला मदत मिळू शकली असती.

Exit mobile version