कोरोनाने अनाथ केलेल्या मुलांसाठी धावून आल्या स्मृती इराणी

कोरोनाने अनाथ केलेल्या मुलांसाठी धावून आल्या स्मृती इराणी

देशात कोरोना विषाणूने कहर माजवला आहे. या विषाणूच्या संसर्गातून माता-पिता गमवावे लागल्याची वेळ अनेक बालकांवर आली आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या या मुलांच्या पुढील पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची बेकायदेशीररित्या दत्तक प्रक्रियाही सुरू झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी आज देशातील जनतेला महत्त्वपूर्ण आवाहन केले. कोरोनामुळे अनाथ झालेली मुले तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील जवळचे कुणी नसेल तर त्या मुलांबाबत पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केले आहे.

कोरोना महामारीत अनेक कुटुंबे बळी ठरली आहेत. काही कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष व पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्या दाम्पत्यांची मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्या जबाबदारीचा, पालनपोषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करीत केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आज एकापाठोपाठ एक ट्विट्स केले. या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक विशेष मोहिमच हाती घेतली आहे.

हे ही वाचा:

टाटा उभारणार ४०० ऑक्सिजन प्लांट्स

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकार उताणे

मुंबईतील लसीकरणाला सुरूवात

देशात ऑक्सिजन पुरवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न

जर तुम्हाला कोविड-१९ मुळे आई-वडिल गमवावे लागलेल्या मुलांची माहिती कळली, तसेच त्या मुलांची देखभाल करणारे कुणी नसेल, तर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या पोलिसांना किंवा बालकल्याण समितीला कळवा. याशिवाय तुम्ही चाईल्ड लाईन १०९८ या क्रमांकावरही संपर्क साधू शकता. ही तुमची कायदेशीर जबाबदारी आहे, असे स्मृती ईराणी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले.

Exit mobile version