‘मोदींशी चर्चा करायला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय?’

भाजपाच्या खासदार स्मृती इराणी यांनी विचारला सवाल

‘मोदींशी चर्चा करायला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय?’

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी हे इंडी आघाडीतील पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का ? आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या उंचीच्या व्यक्तीशी वाद घालू शकतात का, असा सवाल इराणी यांनी केला आहे. ज्याला आपल्या बालेकिल्ल्यात भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याशी लढण्याची हिंमत नाही त्यांनी बढाई मारणे सोडून द्यावे. त्यांना पंतप्रधान मोदींसोबत बसून कोणत्या विषयावर वाद घालायचा आहे? असा सवाल त्यांनी केला.

शनिवारी, केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीवर पंतप्रधान मोदींसोबत सार्वजनिक चर्चेचे निमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए. पी. शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी निमंत्रण दिले होते.

हेही वाचा..

कर्नाटकात तिघा पुरुषांचे अपहरण करून छळ

‘प्रचार सभेत आईचा फोटो पाहून पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर उमटलं हसू, झाले भावुक’

संभाजीनगरात मोबाईलच्या दुकानात सापडले ३९ लाख, नोटा मोजण्याचे मशीन!

‘राफा रिकामे करा, नाहीतर घुसतो!’
राहुल गांधी म्हणाले की, अशा वादविवादामुळे लोकांना आमचा दृष्टीकोन समजण्यास मदत होणार आहे. एकतर ते स्वतः किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सहभागी होण्यास आनंद होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, इराणी यांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल खर्गे यांच्यावर टीका केली आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

काँग्रेसकडून जनतेची संपत्ती बोलण्याची भाषा केली जात आहे. नागरिकांची आर्धी संपत्ती हिसकावून घेण्याचे बोलले जाते. राम मंदिराबाबतचा निर्णय आपण मागे घेऊ असे बोलले जाते. हे प्रश्न राष्ट्रीय आहेत. त्यावर मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. जर खर्गे यांना वाटत असेल की जागरूक मतदार आणि नागरिकांनी राष्ट्रीय राजकारणात रस घेऊ नये, तर कदाचित त्यांना असे वाटते की प्रत्येकाचे विचार राहुल गांधींसारखे आहेत.

खर्गे यांनी यापूर्वी इंडी आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिले होते आणि दावा केला होता की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यांनी एक्सवर पत्र शेअर करून आयोगाची विश्वासार्हता खालच्या पातळीवर गेल्याचे सांगितले होते.

Exit mobile version