धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

टाटा स्मारक रुग्णालयाच्या अहवालानुसार कोरोनाचा धोका हा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये जास्त आहे. धूम्रपान करणारी व्यक्ती कोरोना संसर्गामुळे गंभीर परीणामांना सामोरे जाऊ शकते, असे या अहवालात ठळकपणे म्हटले आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे असे आता स्पष्ट झाले आहे. धूम्रपान न करणारी व्यक्ती याच्या तुलनेमध्ये अधिक संसर्ग हा धूम्रपान करणारी व्यक्तीमध्ये होतो. त्यातही सर्वाधिक धोका हा वय वर्षे ६५ वरील रुग्णांना अधिक आहे.

कोरोनामध्ये प्रामुख्याने आपल्या फुप्फुसांवर संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे फुप्फुसांवरील हा संसर्ग अनेकदा जीवघेणाही ठरू शकतो. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये आधीच फुप्फुसांवर धूम्रपानाचा वाईट परीणाम झालेला असतो. त्यामुळेच अशांना कोरोनाचा धोका अधिक संभवतो. धूम्रपानामुळे फुप्फुसे आधीच निकामी झालेली असतात. त्यातून गंभीर आणि गुंतागुंतीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक सी. एस. प्रमेश यांनी दिली.

हे ही वाचा:

स्विस बँकेतील काळ्या पैशाचे वृत्त सफेद झूठ

अजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ

खारफुटींची कत्तल करून बांधला दोन किलोमीटरचा रस्ता

कोरोनामुळे त्या वकिलांनी सोडला पेशा

धूम्रपान करणारे कोरोनाबाधित होतात तेव्हा त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध असतो. अशा रुग्णांना श्वसनयंत्रणेवर ठेवण्याचे प्रमाणही अधिक आहे. तसेच मुख्य म्हणजे आधीच फुप्फुसे कमकुवत झाल्यामुळे या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाणही खूप मोठे आहे. टाटा रुग्णालयात प्रामुख्याने कर्करोगावर उपचार केला जातो. यामध्ये अनेक धूम्रपान झालेले रोगीही उपचारासाठी येतात. अशाच रुग्णांचा सखोल अभ्यास करूनच हा अहवाल मांडण्यात आलेला आहे.

धूम्रपान करणारे कोरोनाबाधित होतात तेव्हा मृत्यूचा धोका हा अधिक असतो हे आता अहवालातून समोर आलेले आहे. तसेच इतर कोरोना रुग्णांपेक्षा धूम्रपान करणारे कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण तीन टक्के अधिक आहे.

Exit mobile version