प्रज्ञानने काढला विक्रमचा फोटो !

या प्रतिमेला इस्रोने 'इमेज ऑफ द मिशन' असे म्हटले आहे

प्रज्ञानने काढला विक्रमचा फोटो !

चांद्रयान-३ मोहिमेचा भाग असलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिर उभ्या असलेल्या विक्रम लँडरची प्रतिमा कॅप्चर केली आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने बुधवारी विक्रम लँडरची काढण्यात आलेली प्रतिमा शेअर केली. ही प्रतिमा प्रज्ञान रोव्हरने नेव्हिगेशन कॅमेरा वापरून क्लिक केली आहे.आज सकाळी ७:३५ वाजता विक्रम लँडरची क्लिक करण्यात आली आहे.

२३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केल्यापासून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-३ मोहीम सुरू केली आहे.चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिर उभ्या असलेल्या विक्रम लँडरची एक प्रतिमा रोव्हरने काढली. इस्रोने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘स्माइल प्लीज’ या कॅप्शनसह याचा फोटो शेअर केला. इस्रोला मिळालेल्या नवीन प्रतिमेला ‘इमेज ऑफ द मिशन’ असे म्हटले आहे.मिशनसाठी महत्त्वपूर्ण असलेले NavCams हे बेंगळुरूमधील इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS) च्या प्रयोगशाळेने विकसित केले आहेत.हे कॅमेरे रोव्हरचे ‘डोळे’ म्हणून काम करतात.रोव्हर चंद्राच्या भूभागातून मार्गक्रमण करताना त्याला मार्गदर्शन करण्याचे काम हे कॅमेरे करत असतात.

हे ही वाचा:

कैदेत असलेल्या वाधवान बंधूंची शहराची सैर

रेल्वे यंत्रणांचे नुकसान करणाऱ्याला होणार १० वर्षांची शिक्षा

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचे महत्त्व

प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर सापडला ऑक्सिजन आणि काही धातू

तसेच चंद्रावर रोव्हरचे सुरक्षित नेव्हिगेशन सुनिश्चित करून मार्ग नियोजन आणि अडथळा टाळण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे मौल्यवान वैज्ञानिक डेटा गोळा करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत.रोव्हरमध्ये अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) हे दोन पेलोड आहेत, जे चंद्राची माती आणि खडकांच्या मूलभूत आणि खनिज रचनांचे विश्लेषण करण्याचं काम करतात.प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरची काढलेली प्रतिमा या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून LEOS-ने विकसित केलेल्या NavCams च्या तांत्रिक पराक्रमावर अधिक प्रकाश टाकते.

 

 

 

Exit mobile version