भारताची सध्या आदित्य एल- १ ही पहिली सूर्य मोहीम सुरू आहे. आदित्य एल- १ चे आंध्र प्रदेशच्या श्री हरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. आदित्य एल- १ ला सूर्याच्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या हे यान पृथ्वीच्या कक्षेत असून आदित्य एल- १ ने काही फोटो काढले आहेत.
‘आदित्य एल- १’ हा उपग्रह सध्या पृथ्वीच्या कक्षेत आहे. याठिकाणाहून त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आहेत. सोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. सेल्फीमध्ये आदित्यमधील VELC आणि SUIT हे दोन पेलोड दिसतात. आदित्यने पृथ्वीचा जवळून फोटो काढला आहे. यात चंद्र दूर अंतरावर दिसतोय.
सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये लॅगरेंज पॉइंट आहे. तिथे आदित्य एल- १ ला स्थापित करण्यात येणार आहे. या पॉइंटवरुन सूर्यावर पूर्णवेळ लक्ष ठेवता येणार असून अनेक रहस्य उलगडणार आहेत. आदित्य एल- १ १५ लाख किलोमीटर प्रवास करून अपेक्षित ठिकाणी पोहचणार आहे. २ सप्टेंबरला PSLV रॉकेटने आदित्य एल- १ ला प्रक्षेपित करण्यात आलं आहे. १६ दिवस आदित्य एल- १ पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणार आहे.
हे ही वाचा:
‘भारत उत्पादनाचे नवीन केंद्र असेल’
पंतप्रधानांची ‘सनातन धर्मा’च्या संरक्षणाची हाक
ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित
विजयाचे गणितच न समजल्याने अफगाणिस्तानच्या हातून सामना गेला!
पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान १२५ दिवसांनी पोहोचणार आहे. ‘एल-१’ हा सूर्याच्या तुलनेने सर्वात जवळचा बिंदू मानला जातो. अवघ्या ४०० कोटींच्या बजेटमध्ये सौर मोहीम राबवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यापूर्वी भारताचे चांद्रयान- ३ मिशन सुद्धा यशस्वी ठरलं आहे. २३ ऑगस्टला चंद्रावर सॉ़फ्ट लँडिंग करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचलेला पहिला देश म्हणून नाव कमावत भारताने इतिहास रचला.