समाचार मान्यता असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग (SMART) यांनी पहिला ‘नॅशनलिस्ट मिडीया फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज दसऱ्याच्या (१५ ऑक्टोबर) शुभ मुहूर्तवार होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन केले जाणार आहे. तीन दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ, लेखक आणि वक्ते हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. धर्म आणि राष्ट्रीय महत्त्व असे विषय या कार्यक्रमात हाताळले जाणार आहेत. हा कार्यक्रम १५, १६ आणि १७ ऑक्टोबरला ४ ते ६ या वेळेत पार पडणार आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात गर्दी करण्याची मुभा?
काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण
… म्हणून मुंबई पोलीस समीर वानखेडेंना समन्स पाठवणार
भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!
इन्फिनिटी फाउंडेशनचे संस्थापक राजीव मल्होत्रा, सलवान शिक्षण विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष सुशील सलवान, लेखिका आणि समालोचीका सहना सिंह, सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजचे संचालक जे. के. बजाज, चित्रपट निर्माते मयंक जैन, आयआयएम रोह्ताकचे संचालका प्रा. धीरज शर्मा, स्वराज्यच्या वरिष्ठ संपादक स्वाती गोयल- शर्मा, निमित्तेकमचे संस्थापक डॉ. ओमेंद्र रत्नू, सिर्फ न्यूजचे मुख्य संपादक सुरजित दासगुप्त, इंडिक अकॅडमी आणि NICE चे संस्थापक हरी किरण वदलामनी, लेखक आमिष त्रिपाठी, इंडिया प्राईड प्रोजेक्टचे सह संस्थापक अनुराग सक्सेना अशा सर्व मान्यवरांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे.
या कार्यक्रमात https://smartmediafest.eventvirtually.com/ या लिंकवरून सहभाग घेता येईल.