सन २०२३मध्ये छोटे गुंतवणूकदार, छोट्या शेअर्सनी केली कमाल

बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये १३,०७४.३६ अंकांनी म्हणजेच ४५.२० टक्क्यांनी वाढ

सन २०२३मध्ये छोटे गुंतवणूकदार, छोट्या शेअर्सनी केली कमाल

इक्विटी बाजारासाठी सन २०२३ हे कमालीचे वर्ष ठरले. या वर्षी छोट्या शेअरना गुंतवणूकदारांनी पहिले प्राधान्य दिले. छोट्या गुंतवणूकदारांनीही या वर्षी कमाल केली. शेअर बाजारात १० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे योगदान अंशतः असले तरी संपूर्ण गुंतवणुकीपैकी त्यांचा वाटा एक तृतियांश होता. शेअर बाजारात दीर्घकाळापासून तेजी कायम आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर त्यांच्या समकक्ष शेअरच्या पुढे चालले आहेत.

या वर्षी २२ डिसेंबर २०२३ म्हणजेच शुक्रवारपर्यंत बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये १३,०७४.३६ अंकांनी म्हणजेच ४५.२० टक्क्यांनी वाढ झाली. तर, मिडकॅप इंडेक्स १०, ५६८.१८ अंक म्हणजेच ४१.७४ टक्क्यांनी वाढला. याच कालावधीत बीएसई ३० शेअरच्या इंडेक्समध्ये १०, २६६.२२ अंकांनी म्हणजेच १६.८७ टक्क्यांनी वाढ झाली. याच वर्षी २२ डिसेंबर रोजी स्मॉलकॅप इंडेक्सही ४२, ६४८.६८ अंकावर पोहचून त्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. त्याच दिवशी मिडकॅप इंडेक्सही ३६, ४८३.१६ अंकाच्या विक्रमी शिखरावर पोहोचला. बीएसई इंडेक्सही २० डिसेंबर रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक ७१, ९१३ अंकांवर पोहोचला होता.

हे ही वाचा:

जय श्रीराम: भाजी विक्रेत्याने तयार केलेले नऊ देशांची वेळ दाखवणारे घड्याळ राम मंदिराला भेट

शेकोटीजवळ हात शेकत असताना भिंत कोसळली आणि…

इस्रायली जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर हिंदी महासागरात तीन युद्धनौका करडी नजर ठेवणार

सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य हिंदू धर्माविषयी ओकली गरळ

मिडकॅप आणि स्मॉलकॅप म्हणजे काय?

मिडकॅप इंडेक्स या कंपन्यांवर लक्ष्य ठेवतो, ज्यांचे बाजारमूल्य ब्लू चिप (शेअरचे दर उच्च असणाऱ्या कंपन्या)चा पाचवा भाग असतात. तर, स्मॉल कॅप कंपन्या त्यांचा दहावा भाग असतात. विश्लेषकांनी या वर्षी इक्विटी बाजारामध्ये आलेल्या तेजीचे श्रेय चांगला देशांतर्गत व्यापार, मूलभूत आर्थिक सिद्धांत आणि छोट्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाला दिले आहे. जेव्हा समग्र अर्थव्यवस्था मजबूत असते, तेव्हा स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर चांगली कामगिरी करतात, असे एयूएम कॅपिटलचे राष्ट्रीय प्रमुख (वेल्थ) मुकेश कोचर यांनी सांगितले.

तेजीचे मुख्य कारण काय?

छोट्या गुंतवणूकदारांमध्ये झालेली वाढ, सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक झालेली ७.६ टक्क्यांची जीडीपी वाढ यामुळे शेअर बाजारात वाढ झाल्याचे मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक पल्का अरोरा चोप्रा यांनी सांगितले. सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर येणारी स्थिरता तसेच, २०२३मध्ये इक्विटी बाजारात विदेशी निधीचा संकेतही यातून मिळत असल्याचे विशेषज्ञ सांगतात.

Exit mobile version