कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ, तर मृतांच्या संख्येत घट

कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ, तर मृतांच्या संख्येत घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात १ लाख ३४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात २ हजार ८८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

गेल्या २४ तासात भारतात १ लाख ३४ हजार १५४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ८८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ११ हजार ४९९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ८४ लाख ४१ हजार ९८६ वर गेला आहे. देशात २ कोटी ६३ लाख ९० हजार ५८४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ९८९ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर १७ लाख १३ हजार ४१३ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

दिल्लीच्या मशिदीत अल्पवयीन मुलीचा बलात्कार, मौलवीला अटक

‘तुझ्या बापाला’…किशोरी पेडणेकरांची जीभ घसरली

भेट लागी जिव्हारी

ट्विट डिलिट केले तरी महापौरांची असभ्य अक्षरं कोरली गेली आहेत

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version