कोरोना रुग्ण संख्येत ५ हजारांची वाढ

कोरोना रुग्ण संख्येत ५ हजारांची वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत ५ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात १ लाख ३२ हजार ७८८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात ३ हजार २०७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत अल्प वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

गेल्या २४ तासात भारतात १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार २०७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ३१ हजार ४५६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ८३ लाख ७ हजार ८३२ वर गेला आहे. देशात २ कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १०२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर १७ लाख ९३ हजार ६४५ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

खंडणीखोर सरकारने पोलिसांकरवी वसुली सुरू, आता त्याची कटू फळे भोगावी लागत आहेत

महिला कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याबद्दल इम्तियाझ जलील यांच्यावर गुन्हा दाखल

जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात

अब की बार, फिर से ३०० पार

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version