कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ५४ हजार ६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार ३२१ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

गेल्या २४ तासात भारतात ५४ हजार ६९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३२१ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ६८ हजार ८८५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ८२ हजार ७७८ वर गेला आहे. देशात २ कोटी ९० लाख ६३ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ९१ हजार ९८१ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ६ लाख २७ हजार ५७ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

ऑनलाईन अध्यापनासाठी गुगलला अधिक पसंती

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?

निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ३० कोटी १६ लाख २६ हजार २८ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version