सोमवार ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी १०:३७ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे जवाहरबाग अग्निशमन केंद्र) तरण तलाव जवळ, प्रतिक्षा इमारती समोर, मनिषा नगर गेट क्रमांक-०१, मनिषा नगर, कळवा, ठाणे (प.) येथे एका घरातील स्लॅब तळमजल्यावरील खोलीत पडला. विक्रांत/४३ इमारत (तळ+०३ मजली इमारत, ३८ वर्षे जुनी इमारत) या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक-१०६ (मालक गणेश जानू धामणे) यांच्या रूमचा स्लॅब तळ मजल्यावरती असलेल्या मे. ग्लोबल ब्युटी सलून (मालक हरून सलमानी हकीम) या सलूनमध्ये पडला.. सदर घटनास्थळी मा. उप-आयुक्त सो. (आपत्ती व्यवस्थापन कक्ष) व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह, मुख्य अग्निशमन अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान इमर्जन्सी वाहन व रेस्क्यु वाहन, कळवा पोलिस कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान बस वाहन व पिकअप वाहनासह, सहाय्यक आयुक्त (कळवा प्रभाग समिती) कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता (सार्वजानिक बांधकाम विभाग-कळवा प्रभाग समिती), कार्यालयीन अधिक्षक (कळवा प्रभाग समिती) उपस्थित आहेत.
सदर इमारतीचा तपशील पुढील प्रमाणे:-
१) तळमजल्यावरती एकूण-०६ दुकाने व ०२-रूम आहेत.
२) पहिला मजल्यावरती एकूण-०६ रूम आहेत.
३) दुसऱ्या मजल्यावर ती एकूण-०६ रूम आहेत.
४) तिसऱ्या मजल्यावर ती एकूण-०६ रूम आहेत.
हे ही वाचा:
एवढी हिम्मत ! पोलीस अधिकाऱ्याच्याच खुर्चीत बसून केला व्हिडिओ शूट
कठीण समय येता, मूळ शिवसैनिक कामास येतो
प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढून दूध का दूध…करणार?
खोटे ‘सोने’ देऊन २० लाखांना फसवले
सदर घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींचा तपशील पुढीलप्रमाणे:-
१) कुमार. आयुष जानू धामने (पू./ वय- २० वर्षे, राहणार- रूम क्रमांक-१०६, विक्रांत/४३ सोसायटी, मनिषा नगर, कळवा, ठाणे) या मुलाच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
२) कु. कादिर सलमानी (पू./ वय- १९ वर्षे, सलून मध्ये काम करणारा कर्मचारी, राहणार:- राबोडी, ठाणे) या मुलाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
३) कु. पार्थ निलेश पाटेकर (पू./ वय- १६ वर्षे, सलूनमध्ये केस कापण्यासाठी आलेला मुलगा, राहणार:- २०३/बी, न्यू पंचदिप सोसायटी, मनिषा नगर, कळवा) या मुलाच्या डोळ्याला व पाठीला दुखापत झाली आहे. वरील सर्व जखमी व्यक्तींना उपचारासाठी प्रमिला हॉस्पिटल, मनिषा नगर, कळवा, ठाणे येथे दाखल केले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून उप-आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशानुसार सदर इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने व पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेला रूम बंद करण्यात आला असून, संपुर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.