22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषकौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील

कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील

आमदार अतुल भातखळकर यांचा विश्वास, मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Google News Follow

Related

रोजागारक्षम पिढी तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आम्ही महिला आधार भवन येथे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे अकाउंट असिस्टंट, टॅली ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग असे कोर्स शिकवले जाणार आहेत. हे कोर्स पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थांना नोकरी मिळणे सोपे होणार आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमान नगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवन या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा..

बांगलादेशातील घुसखोर बंगळुरुत करतात काम

भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला इतिहास

भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला इतिहास

उरण हत्याकांडमधील मुख्य आरोपी दाऊदचा शोध पोलिसांनी कसा घेतला?

आमदार भातखळकर म्हणाले, जगाच्या पाठीवर आज भारत सर्वात तरुण देश आहे. जे लोक आज बेरोजगारीच्या नावाने राजकीय गळे काढतात त्यांनी योग्यवेळी योग्य धोरणे स्वीकारली असती तर देशातील तरुण पिढी कला, कौशल्याने समृद्ध करता आली असती. गेल्या १० वर्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ज्या प्रमुख बाबींवर भर देण्यात आले, त्यात कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. जे मनुष्यबळ कामासाठी उपलब्ध आहे, ते रोजगारक्षम असायला हवे. त्यामुळेच हे प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे.

या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे नवे कोर्स सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय मालाड, पोयसर भागात सुद्धा असे कोर्स सुरु करण्यात येणार आहेत. ज्या कोर्ससाठी साधारण २५ ते ४० हजार रुपये खर्च येतो तोच कोर्स आम्ही मोफत शिकवत आहोत. त्यासाठी आवश्यक संगणक आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणानंतर रितसर त्याची परीक्षा सुद्धा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी कोसिया संस्थेचे निनाद जयवंत, आर. सी. रॉय यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा