‘सिक्सर किंग’ रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी

‘सिक्सर किंग’ रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी

धरमशाला कसोटीत रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली. इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात शतक झळकावले. रोहितच्या या डावात ३ उत्तुंग षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. त्याने षटकारांचा एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतीय कर्णधार म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितने महेंद्रसिंग धोनीची बरोबरी केली आहे. मात्र, याआधीही त्यांनी हा पराक्रम केलेला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने ९ डावात ७  षटकार मारले आहेत. कर्णधार म्हणून टीम इंडियाकडून कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहित अव्वल स्थानी आहे. २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धही त्याने ही कामगिरी केलेली आहे.

रोहितच्या आधी हा विक्रम धोनीच्या नावावर नोंदवला गेला होता. धोनीने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ षटकार मारले होते. त्याचबरोबर २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने ७ षटकार ठोकले होते.

हेही वाचा :

राहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच लढणार

दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स

रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखणारा नवा व्हिडीओ आला समोर

मला ऐकून लोक कंटाळले आहेत या मोदींच्या विधानावर मैथिली म्हणाली बिल्कुल मग…

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. यशस्वी सध्या अव्वल स्थानी आहे. त्याने ९ डावात २६ षटकार ठोकले आहेत. शुभमन गिल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. गिलने ९ डावात ११ षटकार ठोकले आहेत. ध्रुव जुरेल रोहितसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. ध्रुवने ४ डावात ७ षटकार मारले आहेत.

Exit mobile version