गडचिरोलीत नाव पालटून सहा महिला बुडाल्या

बचावकार्य सुरू

गडचिरोलीत नाव पालटून सहा महिला बुडाल्या

गडचिरोलीमधील वैनगंगा नदीमध्ये नाव उलटून मोठा अपघात झाला आहे. चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. या महिलांचा शोध घेतला जात आहे. सहा महिला नदीमध्ये पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २३ जानेवारी रोजी ११ वाजण्याच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही नाव पालटली. या महिला मिरची तोडणीला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांची नाव उलटली. नावाडी पोहून पाण्याबाहेर आला. त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वाचवण्यात अपयश आले. एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे. पाच महिलांचा शोध घेणं अद्याप सुरुच आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नाव बुडाली त्या नदी किनाऱ्यावर गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. पोलिसांकडून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. अद्याप शोधकार्य सुरुच आहे.

हे ही वाचा:

पीएम केअर्स फंडची माहिती उघड करण्याचे निर्देश देणारा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाकडून रद्द!

एआयने केली कमाल आणि रामलल्ला करू लागले स्मितहास्य

येमेनमधील हौथी तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हवाईहल्ले!

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

गणपूर रै आणि परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे. त्यामुळे अनेक जण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये- जा करतात. दरम्यान, २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव जात होती, पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली, त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या. यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला, त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.

Exit mobile version