28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषसिक्कीममधील नाथुलाजवळ हिमस्खलन,६ पर्यटकांचा मृत्यू

सिक्कीममधील नाथुलाजवळ हिमस्खलन,६ पर्यटकांचा मृत्यू

Google News Follow

Related

सिक्कीमच्या नाथुला भागात हिमस्खलन झाले आहे. मंगळवारी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू आणि ११ जण जखमी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. .हिमस्खलनात जवळपास ८० पर्यटक आत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जखमींना राज्याची राजधानी गंगटोक येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. बचाव आणि बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. नाथुला पास हे चीनच्या सीमेवर स्थित आहे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. सध्या या भागात मोठ्या संख्यने पर्यटक आलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाथुला परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास हिमस्खलन झाला. या घटनेनंतर सहा जणांचा जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. गंगटोक ते नाथुला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू रोडला हिमस्खलन झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हिमस्खलनात १५० पेक्षा जास्त पर्यटक अडकून पडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बर्फात अडकलेल्या ३० पर्यटकांना वाचवण्यात आले असून त्यांना गंगटोक येथील एसटीएनएम हॉस्पिटल आणि सेंट्रल रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार

ठाकरे, राऊत, केजरीवाल सगळेच ठरले ‘अनपढ’!

ग्रीन रिफायनरी कोकणातच उभी राहणार!

व्यावसायिकावर करत होता जादूटोणा, गुन्हा दाखल

सध्या सिक्कीम पोलीस, सिक्कीमचे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि चालकांकडून बचावकार्य सुरू आहे.चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनझिंग भुतिया यांच्या म्हणण्यानुसार, “फक्त १३ मैलासाठी पास दिले केले जातात, परंतु पर्यटक परवानगीशिवाय १५ मैलाच्या दिशेने जात आहेत. ही घटना १५ मैलावर घडल्याचे त्यांनी सांगितले.
याआधी मनालीतीळ रोहतांग मार्गावर चुंबक मोर ते मार्ही दरम्यान हिमस्खलन झाले होते. हिमस्खलनामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सततच्या बर्फवृष्टीमुळे रोहतांग पासच्या दर्शनासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. पर्यटकांची वाहने ठराविक ठिकाणापर्यंतच जाऊ शकतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा