ऑलिम्पिक पदक विजेती आणि सहावेळा बॉक्सिंगमध्ये जगज्जेती ठरण्याचा विक्रम करणाऱ्या मेरी कोम हिने बॉक्सिंगमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मेरी कोमने सन २०१२मध्ये ऑलिम्पिक पदकाची कमाई केली होती.मेरी कोम आता ४१ वर्षांची आहे आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघातर्फे पुरुष आणि महिला बॉक्सिंगपटूंना ४० वर्षांपर्यंत स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली जाते. ‘विशिष्ट खेळात सहभागी होण्याची आणि ते जिंकण्याची भूक माझ्यात अजून कायम आहे.
मला अजून खेळायचे आहे. मात्र मला खेळू दिले जात नाही. मी हतबल आहे. हे दुर्दैवी आहे. त्यामुळेच मला संन्यास घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. अर्थात, मी माझ्या करीअरमध्ये सर्व काही मिळवले आहे,’ असे तिने एका कार्यक्रमात सांगितले होते.
हे ही वाचा:
राम मंदिरात पहिल्या दिवशी तीन कोटी १७ लाखांची देणगी!
विजय पाटिदारची निवड योग्य, मात्र अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळणे कठीण!
उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!
कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!
मेरी कोमने बॉक्सिंमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. सहावेळा विश्वविजेतेपदाचा विक्रम करणारी तरी पहिली महिला बॉक्सिंगपटू आहे. तसेच, सन २०१४मध्ये आशियाई खेळांत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला आहे. सन २०१२मध्ये तिने लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदकाची कमाई केली होती. सन २००६मध्ये मेरी कोम हिला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. तर, २००९मध्ये देशातील खेळामधील सर्वोच्च अशा राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
व्यावसायिक बॉक्सिंगपटू होण्याची शक्यता
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खेलो इंडियामध्ये सहभागी झालेल्या मेरी कोम हिने वयोमर्यादेमुळे खेळू शकत नसली तरी आणखी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा बॉक्सिंगशी संबंधित काही तरी करण्याचा प्रयत्न करेन, असे तिने सांगितले होते. ‘मी व्यावसायिक बॉक्सिंगपटू होऊ शकते, परंतु त्याबाबत अद्याप ठरवलेले नाही,’ असेही तिने सांगितले होते.