डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत आज( २३ मे) दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला.या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असू अनेक जण जखमी झाले आहेत.या संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झाले असून येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डोंबिवलीमध्ये एका एमआयडीसीत स्फोट झाला.अमोल राज नावाच्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला.कंपनीतील बॉयलरचा ब्लास्ट झाल्याने ही दुर्घटना घडली.या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झालेले आहे.घटनास्थळी बचाव पथके पोहोचली आहेत.तेथील सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हे ही वाचा:
हमासने अपहरण केलेल्या इस्रायली महिला सैनिकांवरील अत्याचाराचा नवा व्हीडिओ समोर
पुण्यासारखीच जळगावात घटना, अपघातात चार जणांचा मृत्यू, आरोपी मोकाट!
“काँग्रेसला दिलेलं मत व्यर्थ; सात जन्मातही सत्ता येणार नाही”
सीतारामन म्हणतात, एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर येणार!
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एमआयडीसी फेज २ मध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर अग्नीने रौद्र रूप धारण केलं.या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत.जखमींना नजीकच्या रुग्नालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.