बारामतीत होणार नणंद आणि भाऊजय यांच्यात लढत

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट संकेत

बारामतीत होणार नणंद आणि भाऊजय यांच्यात लढत

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग काही दिवसात फुंकले जाऊ शकते. पुढील काही दिवसात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे. पण निवडणुकीपूर्वी जोरदार चर्चा आहे आणि लक्ष लागले आहे ते म्हणझे पुणे जिल्ह्याकडे.

पुणे जिल्ह्यातील बारामती मतदार संघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या नणंद विरुद्ध भावजय यांच्यातील. बारामती जिल्ह्यात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा सुरू होती. परंतु आता स्वतः सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीच्या विकासविषयी तळागाळातील प्रत्येक जण साक्षीदार आहे. तुम्ही सर्वांनी अजित दादांना नेहमी प्रेम दिले आहे. त्या प्रेमाचे उतराई होण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील. तुम्ही मला एक संधी द्याल, अशी आशा मी बाळगते. सुनेत्रा पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे बारामती लोकसभेच्या त्या उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे.

हेही वाचा :

“कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला”

इराणचा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक

“कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला”

‘महानंद’वरून पुन्हा विरोधकांची आग पाखड

सुनेत्रा पवार गेल्या दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज दुसऱ्या दिवशी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्या करणार आहेत. शुक्रवारी सुनेत्रा पवार यांनी विश्वकर्मा जयंतीला देखील उपस्थिती लावली होती. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार बारामतीत सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे. बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत.

 

Exit mobile version