पाम बीचवर उभारणार आर्म ब्रिज

वकरच पाम बीच वरून एका नवीन महामार्ग सुरु होणार आहे .

पाम बीचवर उभारणार आर्म ब्रिज

सायन-पनवेल महामार्गावर प्रवास करणे आता अजून सोपे होणार आहे . लवकरच पाम बीच वरून एका नवीन महामार्ग सुरु होणार आहे . या महामार्गाच्या कामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. या महामार्गाचे काम वाशी सेक्टर १७ पासून सुरू होईल. या प्रकल्पासाठी सुमारे ९.५ कोटी रुपये बजेट निश्चित करण्यात आले आहे. सध्या वाशी वरून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना वाशीतील मुख्य रस्त्याने मोराज सर्कल किंवा एपीएमसी मार्गाने जायला लागते. हा खटाटोप करण्यात प्रवाशांचा खूप वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून वाशी सेक्टर १७ मधील सिग्नल ओलांडल्यावर नाल्यावरून एक “आर्म ब्रीज ” उभारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने या योजनेला संमती दिलेली आहे. ९.५ कोटी रुपये खर्चाचा हा पूल लवकरच बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प ९ महिन्यात पूर्ण होईल असे आश्वासन मुंबई महापालिका आणि प्राधिकरणाने दिले आहे. पायाभरणी पावसाळ्या पूर्वी करण्यात येईल , अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. या पुलाच्या बांधकामामुळे वाशी ते पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासात १५ ते २० मिनिटांची बचत होणार आहे. वाशी परिसरात गर्दी खूप वाढल्याने लोकांना प्रवास करण्यासाठी फार विलंब होतो. या परिसरातली गर्दी कमी करणे आणि प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा महामार्ग मोठी भूमिका बजावणार आहे.

हे ही वाचा :

श्रद्धाला आफताबपासून व्हायचे होते वेगळे

नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

या प्रकल्पासाठी किमान २१ झाडं कापावी लागणार आहेत. त्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाकडे सादर केला आहे पण अजून त्याला स्वीकृती आलेली नाही. महानगरपालिका या बांधकामासाठी पियर सिस्टीम वापरणार आहेत. “हा प्रकल्प खाडीच्या पाण्याचा मुक्त प्रवाह निश्चित करणार असल्याचे लक्षात घेऊन आम्ही या योजनेत काही बदल केले आहेत. त्यासाठी आम्ही आयआयटीची मदत सुद्धा घेणार आहोत”, असे देसाई यांनी सांगितले.

Exit mobile version