बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचे सोमवार, १८ जुलै रोजी निधन झालं. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. भूपिंदर सिंह हे ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भूपिंदर सिंह हे अनेक आजारांचा सामना करत होते, त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झालं होतं. अखेर काल ८२ व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.
भूपिंदर सिंह यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गायलेली काही गाणी आणि गझला अविस्मरणीय असून नवोदित गायकांना भूपिंदर सिंह यांचा प्रवास मार्गदर्शक ठरेल असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहेत.
गायक भूपिंदर सिंह यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४० रोजी अमृतसर येथे झाला. वडील नत्था सिंह यांच्याकडून त्यांना संगीताचं शिक्षण मिळालं. ते लहानपणापासून गिटार वाजवत. ते बॉलिवूडमधील नावाजलेले गायक असून त्यांच्या नावावर अनेक हिट गाणी आहेत. त्यांनी गायलेल्या गझलमुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यादेखील प्रसिद्ध गायिका आहेत. पत्नी मिताली यांच्यासोबत त्यांनी गझल गायनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.
हे ही वाचा:
संजय राऊतांना का झोंबला ‘सय्यद फंडा‘?
सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले अनेकांना मेल
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेला घातला गंडा!
लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते राहुल शेवाळे?
भूपिंदर सिंग यांनी कदर, सत्ते पे सत्ता, मौसम, दूरियां आणि हकीकत या अनेक चित्रपटातीली गाणी गायिली आहेत. ‘प्यार हमें मोड़ पर ले गया’, ‘हुजूर इस कादर’, ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘एक अकेला इस शहर में’, ‘जिंदगी मिलके बिताएंगे’, ‘बिती ना बिताई ना रैना’ ही गाजलेली गाणीही त्यांनीच गायली होती.