अभेद्य सिंधुदुर्ग यंदा नौदल दिनाचा सोहळा अनुभवणार!

दरवर्षी ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो.

अभेद्य सिंधुदुर्ग यंदा नौदल दिनाचा सोहळा अनुभवणार!

४ डिसेंबरला साजरा होणारा नौदल दिन मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असणाऱ्या ऐतिहासिक आणि अभेद्य अशा सिंधुदुर्गावर साजरा केला जाणार आहे. दरवर्षी ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. यंदा या सोहळ्य़ाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्गात होणाऱ्या या कार्यक्रमात ७० लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत. यंदाच्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौसेनेच्या सामर्थ्याचे मोठे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार आहे. जगात चौथ्या क्रमांकाची बलाढ्य नौसेना म्हणून भारतीय नौसेनेला ओळखले जाते.

का साजरा केला जातो नौदल दिन?

१९७१ च्या भारत- पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला करून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले होते. त्यामुळे पाकिस्तानला सपशेल शरणागती पत्करावी लागली होती. या हल्ल्यानंतर भारतीय नौदलाची ताकद साऱ्या जगाला कळली होती. त्यामुळेच दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांनी सोडले जुनेच बाण!

मशीद बंदर परिसरातील मिनारा मशिदीजवळ लागली आग

डोंबिवलीतल्या कैवल्यवारीत ‘अवघा रंग एक झाला’

गुजराती बिल्डर चालतो, गृहमंत्री गुजराती नको…

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमार व सागरी सुरक्षेला प्राधान्य देत व्यापारी, चाचे आणि ब्रिटिशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी गडांची गरज जाणली होती. त्यानंतर अभेद्य असा सिंधुदुर्ग बांधला. नौदल दिनानिमित्त हिंदुस्थानी नौदलाच्या सामर्थ्याचे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गाच्या समुद्रात होणार आहे.

Exit mobile version