टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते मिराबाई चानूने रौप्यपदकाच्या सहाय्याने उघडल्यानंतर आता भारताच्या आणखी काही प्रमुख खेळाडूंकडे नजरा वळल्या आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक जिंकून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू रविवारी (२५ जुलै) आपल्या मोहिमेला प्रारंभ करत आहे. इस्रायलच्या केसेनिया पॉलिकार्पोव्हाविरुद्ध तिची सलामीची झुंज असेल. आणखी खेळाडूच्या कामगिरीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले असेल ती म्हणजे बॉक्सर मेरी कोम. तिची ४८-५१ किलो वजनी गटातील लढत होणार आहे.
त्यानंतर भारताचे लक्ष असेल ते नेमबाजीकडे. नेमबाजीत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात यशस्विनी सिंग देसवाल, मनू भाकर यांची कसोटी असेल. ही महिलांची पात्रता फेरी आहे. त्यानंतर स्कीटमध्ये पात्रता फेरीत मायराज खान, अंगद वीर सिंग बाजवा हे खेळणार आहेत. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये पात्रता फेरीत दीपक कुमार आणि दिव्यांश सिंग पन्वर खेळणार आहेत.
टेबल टेनिसमध्ये मनिका बात्राचा खेळ पाहायला मिळेल. महिलांची ही दुसऱ्या फेरीची लढत असेल. शिवाय, पुरुषांत साथियन ज्ञानशेखरनही झुंजणार आहे. कलात्मक जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणती नायक खेळेल.
हे ही वाचा :
आमीषांना बळी पडलेले आता अडकले बदला’पुरात’
१७व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; ५ जण मृत्युमुखी
नौदलाला गुरुवारीच कळवले असते तर…
….म्हणून ९९९पादचाऱ्यांनी गमावले प्राण!
मुसळधार पावसाने अवघ्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत थैमान घातले. पूर, दरडी कोसळण्याच्या दुर्घटना, त्यात अनेकांचे गेलेले बळी यामुळे हॉकीत भारतीय पुरुषांची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. तर सेलिंगमध्ये महिलांच्या एकेरी लेझर रेडियलमध्ये नेत्रा कुमानन खेळणार आहे. तर पुरुषांत विष्णू सर्वानन कोणती कामगिरी करतो हे पाहावे लागेल.
जलतरणात महिलांमध्ये माना पटेल तर पुरुषांत श्रीहरी नटराज यांची कसोटी लागेल.
२५ जुलैच्या लढती
नेमबाजी
स. ५.३० वा. : १० मी. एअर पिस्तुल (महिला, यशस्विनी सिंग देसवाल, मनू भाकर).
स. ६.३० वा. : स्कीट (पुरुष, मायराज खान, अंगद बाजवा)
स. ९.३० वा. : १० मी. एअर रायफल (पुरुष, दीपक कुमार, दिव्यांश सिंग पन्वर)
बॅडमिंटन
स. ७.१० वा : महिला एकेरी – सिंधू वि. पॉलिकार्पोव्हा
टेनिस
स. ७.३० वा. : महिला दुहेरी (सानिया मिर्झा- अंकिता रैना)
बॉक्सिंग
दु. १.३० वा. : महिला फ्लायवेट (मेरी कोम)
दु. ३.०६ : लाइटवेट (मनीष कौशिक)
हॉकी
दु. ३ वा. : पुरुष अ गट भारत वि. ऑस्ट्रेलिया
टेबल टेनिस
१०.३० वा. : पुरुष एकेरी (साथियन ज्ञानशेखरन)
१२.०० वा. : महिला एकेरी (मनिका बात्रा)
जलतरण
३.३२ वा. : महिला १०० मी. बॅकस्ट्रोक (माना पटेल)
४.२६ वा. : पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक (श्रीहरी नटराज)
सेलिंग
८.३५ वा. : महिला लेझर रेडियल (नेत्रा कुमानन)
११.०५ वा. : पुरुष लेझर रेस (विष्णू सर्वानन)
कलात्मक जिम्नॅस्टिक्स
६.३० वा. : प्रणती नायक (पात्रता फेरी)